घरक्रीडा'असा' रेकॉर्ड बनवणारा रोहित शर्मा ठरला पहिला खेळाडू

‘असा’ रेकॉर्ड बनवणारा रोहित शर्मा ठरला पहिला खेळाडू

Subscribe

रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. लागोपाठ सात सिरीजमध्ये सेंचुरी करणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला बॅट्समन ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या तीन वनडे सिरीजमधील पहिली मॅच भारतानं दमदार कामगिरी करत जिंकली आहे. डावखुऱ्या बॉलर कुलदीप यादवच्या सहा विकेट्सच्या आणि रोहित शर्माच्या १८ व्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या मॅचमध्ये आठ विकेट्सनं इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे. या शतकानंतरच रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. लागोपाठ सात सिरीजमध्ये सेंचुरी करणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला बॅट्समन ठरला आहे. या मॅचमध्ये रोहित शर्मानं १५ फोर्स आणि ६ सिक्ससह ११४ बॉल्समध्ये १३७ रन्स काढल्या असून रोहितचं हे १८ वं शतक आहे. तर विराट कोहलीबरोबर त्यानं दुसऱ्या विकेटसाठी १६७ रन्सची भागीदारी केली.

विराटचा रेकॉर्ड मोडला

रोहित शर्मानं विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावे होता. विराट कोहलीनं २०११ आणि २०१२ दरम्यान लागोपाठ ६ वनडे सिरीजमध्ये शतक बनवलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनंदेखील चांगली कामगिरी केली असून ७५ रन्स काढले. तर आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये स्टम्प आऊट झाल्याचा रेकॉर्ड आहे.

- Advertisement -

रोहितची कामगिरी

भारतीय संघाचा सलामीचा बॅट्समन म्हणून रोहित शर्मानं सुरुवात केली. पदार्पणातच पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये त्यानं सलग दोन सेंचुरी केली. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -