घरमनोरंजन'अक्षरा' हिना खानचा नवा अंदाज

‘अक्षरा’ हिना खानचा नवा अंदाज

Subscribe

हिनानं आपल्या इन्स्टाग्रामवरून तिच्या नव्या व्हिडिओचा टीझर पोस्ट केला आहे. 'हा आहे #Bhasoodi चा नवा टीझर, हे गाणं पाच दिवसानं लाँच होईल' असं कॅप्शन देत तिनं चाहत्यांना नवी भेटच दिली आहे.

टीव्हीच्या पडद्यावर सालस आणि सुशील अशा ‘अक्षरा’ अर्थात हिना खानचा नवा अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘बिग बॉस’ च्या मागच्या सीझनमध्ये फायनलपर्यंत धडक मारणाऱ्या हिना खानची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिचे खूपच चाहते असून ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्याबद्दल नेहमीच ती चाहत्यांना सोशल मीडियावरून माहिती देत असते. नुकतंच तिनं आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. हिनानं आपल्या इन्स्टाग्रामवरून तिच्या नव्या व्हिडिओचा टीझर पोस्ट केला आहे. ‘हा आहे #Bhasoodi चा नवा टीझर, हे गाणं पाच दिवसानं लाँच होईल’ असं कॅप्शन देत तिनं चाहत्यांना नवी भेटच दिली आहे.

हिनाचा व्हिडिओमध्ये नवा अवतार

व्हिडिओच्या टीझरमधून हिनाचा नवा अवतार मोठा धमाका निर्माण करणार असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत हिनाला नेहमीच सालस सुनेच्या अवतारात पाहिलं गेलं आहे. मात्र या गाण्यात तिनं शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट घातलं असून ती या लुकमध्ये बोल्ड आणि सिजलिंग दिसत आहे. तिनं आपली सालस आणि सुशील इमेज मागे टाकत एक नवा अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये तिनं स्वतः गाणं गायलं आहे. हिनानं याआधीही ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ मधून आपल्या आवाजाची झलक प्रेक्षकांना दिली होती. सलमान खाननंदेखील तिच्या आवाजाची स्तुती केली होती. या म्युझिक व्हिडिओला प्रीत हुंडायनं संगीत दिलं असून सोनू ठकुरालनं गायलं आहे. तर रॉबी सिंहनं या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. पंजाबच्या पटियाळामध्ये या व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -