बघा कोण आहेत भारतीय संघाचे खरे पाठीराखे..

यांच्या सपोर्टशिवाय प्रत्यक्ष खेळणारे अकरा पूर्ण होऊच शकत नाही.

team_india22052019withStaff
भारतीय संघ आणि त्याचे पाठीराखे

विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघ विजयाचा धुमाकूळच घालत आहे. कालचा इंग्लंडविरुद्धचा सामना सोडल्यास भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.
या स्पर्धेमध्ये 11 अधिक 4 अशा खेळाडूंसोबतच आणखी काही सदस्य या संघाचा भाग असतात. अर्थात त्यांच्या सपोर्टशिवाय प्रत्यक्ष खेळणारे अकरा पूर्ण होऊच शकत नाही.

चला बघू तर मग कोण आहेत हे पाठीराखे..

रवी शास्त्री, हेड कोच

भारतीय संघाचे मुख्य व्यवस्थापक. यांना सर्व सदस्यांच्या व्यवस्थापणासोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत वेळोवेळी चर्चा करावी लागते. थोडक्यात संघ आणि नियामक मंडळ यातील दुवा म्हणून यांना ओळखले जाते.

संजय बांगर, बॅटिंग कोच

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजी खेळाडू. भारतीय संघात कसोटी क्रिकेट मध्ये काही काळ फलंदाज परंतु यांची ओळख रणजी, रेल्वे यांसारख्या प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमधूनच जास्त होते. फलंदाजी संदर्भात संघाला कायम शिकवत राहणं तसेच नवे फटके शिकवनं हे यांचं काम. रोहित, पांड्या, विराट तसेच काही गोलंदाज देखील यांच्याकडून शैलीदार फटके कसे मारावे याचे धडे गिरवतात.

भरत अरुण, बॉलिंग कोच

पूर्वी फक्त फलंदाजीवर संघाची मदार होती. त्यामुळे गोलंदाजीमध्ये सुसूत्रता येत नव्हती. ती सुसूत्रता आणावयाचे काम भरत अरुण यांनी केले. यंग जनरेशनच्या गोलंदाजांना त्याच्या ऍक्शन पासून ते मनगटी स्विंग पर्यंत नवनवीन गोष्टी शिकवण्याचे तसेच द्रुतगगती गोलंदाजांचे रनअप कमी करणे वाढवणे हे महत्वाचे काम करतात.

आर.श्रीधर, फिल्डिंग कोच

खेळाडूंना फिल्डिंगसाठी कोणत्या पॉइंटवर उभे करायचे? कोणता खेळाडू कोणत्या पॉईंट वर उत्कृष्ट काम करू शकेल? या महत्वाच्या बाबी कर्णधार विराट कोहली सोबत चर्चा करून ठरवणे तसेच सर्व खेळाडूंना त्या त्या पॉईंट संदर्भात मार्गदर्शन करतात. सरावादरम्यान स्लिप गली पॉईंट मिड ऑन मिड ऑफ यांवर आलेल्या कॅचेसचा सराव करून घेण्याचे काम आर. श्रीधर करतात.

शंकर बसू, ट्रेनर

भारतीय संघात जिम कल्चर रुजवण्याचे काम यांनी केले. सर्व खेळाडू तंदरुस्त कसे राहतील याकडे यांचे लक्ष असते. खेळाडूंनी काय खावे काय खाऊ नये यावर बारकाईने नजर ठेवण्याचे काम हे करतात. सामन्यात सर्व खेळाडूंनी परफॉर्मन्स देणं अपेक्षित असतं. त्यासाठी फिट असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे.

सुनील सुब्रमण्यम, मॅनेजर

संघाचे मॅनेजर म्हणजे संघाचा सर्वात जवळचा मित्र समजला जातो. हे काम सुनील सुब्रमण्यम करतात. मूळचे तामिळनाडूचे असलेले बी. सुनील आपले काम चोख बजावत आहेत.

पॅट्रिक फरहार्ट, फिजिओ

मूळचे ऑस्ट्रेलियन असलेले पॅट्रिक यांनी आपले करिअरच फिजिशियन मध्ये करण्याचे ठरवले आणि त्यानुसार या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली. खेळाडूंच्या दुखापतीवर मात करून त्यांना परत मैदानावर दाखल करण्याचे काम हे करतात. सामन्यादरम्यान खेळाडूला दुखापत झाल्यास मैदानात पळत जाऊन त्यावर इलाज करण्याचे काम पॅट्रिक करतात. यामध्ये सहसा खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी आखणी ते करत असतात.

नुवान सेनेविरत्ने, थ्रोडाऊन स्पेशलिस्ट

मूळचे श्रीलंकेचे असलेले नुवान २०१७ पासून भारतीय संघाचे भाग आहे. यांकडे डावखुऱ्या बॉलर्सचा सामना कसा करावा याची जबाबदारी आहे.

रघू,थ्रोडाऊन स्पेशलिस्ट

या रघुमुळे मी १४०च्या वेगाने येणाऱ्या बाउन्सर बॉल चा सामना करू शकतो असं कोहलीने एकदा पत्रकार परिषदेत सांगितले आणि रघु फेमस झाले. रघु यांचं काम सरावादरम्यान खेळाडूंना जास्तीत जास्त वेगाने शॉर्टपीच बॉल टाकणे आणि त्यांच्याकडून सर्वात जास्त सर्व करून घेणं हे होय.

अरुण कनाडे, मसाजर

सतत आठ तास खेळल्यामुळे खेळाडूंचं शरीर थकतं, पुढच्या सामन्याला तयार होण्यासाठी खेळाडूंना ऊर्जा गोळा करण्यासाठी मसाज हा रामबाण उपाय आहे. हा मसाज करन्याचे काम कनाडे हे करतात.

हृषिकेश उपाध्याय, लॉजिस्टिक मॅनेजर

भारतीय संघाचा प्रवास त्याचे नियोजन तसेच त्याची आखणी, सरावादरम्यान असलेला गोष्टी जुळवण्याचे कार्य उपाध्याय करतात.

धनंजय, व्हीडिओ अॅनलिस्ट

धनंजय यांचं काम संघातील खेळाडूंचे व्हिडीओ बारकाईने बघणे त्यासंदर्भात सुधारणा कारण्यासाठी वेळोवेळी सूचना करणे. त्यासोबतच खेळाडूंना प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हिडीओ दाखवणे त्यावर रणनीती आखण्याचे काम धनंजय करत असतात.

मौलीन पारीख आणि राजल अरोरा, मीडिया मॅनेजर

मीडिया संदर्भात असलेले सर्व विषय पारीख आणि अरोरा हे करतात. थोडक्यात हे दोघेही भारतीय संघाच्या जनसंपर्काचे काम बघतात. प्रेस कॉन्फरन्स कधी बोलवणे, प्रेससाठी काही मह्त्वाच्या बाबी असतील त्यासंदर्भात काम करणे हे यांचे मुख्य काम होय.

यासोबतच व्यवस्थापनाने चार नेट बॉलर्सना इंग्लंडमध्ये नेलं आहे. अवेश खान, दीपक चहर, नवदीप सैनी आणि खलील अहमद हे चौघंजण टीम इंडियाबरोबर आहेत. विश्वचषक संघाच्या अधिकृत संघाचा ते भाग नाही पण सराव सत्रावेळी हे चौघं उपस्थित असतात.