घरक्रीडाIND vs SL Analysis: अय्यरने घेतली रहाणेची जागा, रोहितही ठरला हिट; टीम...

IND vs SL Analysis: अय्यरने घेतली रहाणेची जागा, रोहितही ठरला हिट; टीम इंडियासाठी कशी ठरली कसोटी मालिका

Subscribe

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. श्रीलंका संघाने भारतीय मैदानावर सलग सातवी मालिका हातातून गमावली. भारतीय मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकूण नऊ मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत दोन सामने ड्रॉ झाले आहेत. टीम इंडियाच्या या विजयात अनेक सकारात्मक पैलू आहेत, तर काही क्षेत्रांमध्ये अजूनही सुधारणांची गरज आहे. वनडे आणि टी-२० नंतर कर्णधार म्हणून रोहित शर्मा कसोटीतही हिट ठरला आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत अजिंक्य रहाणेची जागा श्रेयस अय्यरने घेतली आहे. रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.

या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेत रिषभ पंतवर जोरदार टीका झाली होती. तो महत्त्वाच्या वेळी विकेट गमावण्यासाठी ओळखले जातो. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पंतने जबाबदारीने फलंदाजी केली. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ९६ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३९ आणि दुसऱ्या डावात ५० धावा केल्या होत्या.

- Advertisement -

T20 नंतर रोहित शर्माही कसोटीत ठरला हिट

रोहित शर्माला गेल्या वर्षाच्या अखेरीस पहिल्या T20 आणि नंतर ODI संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर, रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-२०, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. आता त्याने कसोटीतही कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केली आहे.

अय्यरने घेतली रहाणेची जागा

फलंदाज अजिंक्य रहाणेच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला. जेव्हा रहाणे न्यूझीलंडविरुद्ध खेळला तेव्हा तो एका सामन्यात संघाचा कर्णधार होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत रहाणेला दुखापत झाल्यामुळे अय्यरला संधी मिळाली होती. अय्यरने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात अनुक्रमे २७, ९२ आणि ६७ धावा केल्या. अय्यरला दुसऱ्या कसोटीत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

- Advertisement -

जसप्रीत बुमराहचे धमाकेदार पुनरागमन

जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण १० विकेट्स घेतल्या. पहिल्या कसोटीत बुमराहला चांगली कामगिरी करता आली नाही, पण दुसऱ्या सामन्यात त्याने कहरच केला. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले होते.

टीम इंडियासाठी या मालिकेतील चार डावांमध्ये फिरकीपटूंनी ४० पैकी २५ बळी घेतले. अश्विनने १२, जडेजाने १० आणि अक्षर पटेलने ३ गडी बाद केले. श्रीलंकेच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, भारताच्या पडलेल्या २७ विकेटपैकी फिरकीपटूंनी १९ विकेट्स घेतल्या.


हेही वाचा : Maharashtra SSC Exams 2022: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -