घरक्रीडाENG vs SL : श्रीलंकेचे तीन प्रमुख क्रिकेटपटू निलंबित; ‘हे’ ठरले कारण

ENG vs SL : श्रीलंकेचे तीन प्रमुख क्रिकेटपटू निलंबित; ‘हे’ ठरले कारण

Subscribe

आता श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून या मालिकेत श्रीलंकेला तीन प्रमुख खेळाडूंविना खेळावे लागेल.     

श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) आपल्या तीन प्रमुख क्रिकेटपटूंना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून नुकतीच या संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. या टी-२० मालिकेत इंग्लंडने श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. या मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी पार पडला. त्यानंतर रविवारी सलामीवीर दानुष्का गुणथिलका, फलंदाज कुसाल मेंडिस आणि यष्टीरक्षक निरोशन डिकवेला हे श्रीलंकेचे तीन प्रमुख खेळाडू डरहम येथे फिरताना दिसले. त्यामुळे या तिघांना श्रीलंका क्रिकेटने निलंबित करत त्यांना इंग्लंडमधून मायदेशी परत बोलावले आहे.

बायो-बबलच्या नियमांचे उल्लंघन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नसते. मात्र, असे असतानाहीगुणथिलका, मेंडिस आणि डिकवेला हे श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू डरहम येथे रस्त्यांवर फिरताना दिसले. याचा व्हिडिओ श्रीलंकेच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. श्रीलंका क्रिकेटने या प्रकरणाची दखल घेतली. तिन्ही खेळाडूंनी बायो-बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना त्वरित मायदेशी परत बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

एकदिवसीय मालिकेत तिघांविना खेळावे लागणार

श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ०-३ अशी गमावली. ऑक्टोबर २०२० पासून टी-२० मालिका गमावण्याची ही श्रीलंकेची सलग पाचवी वेळ होती. या पराभवानंतर सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, रोशन महानामा, हसन तिलकरत्ने आणि तिलकरत्ने दिलशान या माजी क्रिकेटपटूंनी श्रीलंकेच्या संघावर जोरदार टीका केली होती. आता श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून या मालिकेत श्रीलंकेला तीन प्रमुख खेळाडूंविना खेळावे लागेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -