घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रमावस्था नाही, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रमावस्था नाही, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

Subscribe

सरकार ५ वर्षांचा कालावधी पुर्ण करणार

महाविकास आघाडीच्या गोटात राजकाऱ्यांच्या भेटींमुळे चर्चांना उधण आहे. मागील दोन दिवसांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटलय की, अश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था नाही अत्यंत सुरळीत मार्गाने पुढे निघालेली आहे. शरद पवार यांनीही निवेदन केलं आहे की, सरकार ५ वर्षांचा कालावधी पुर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावरही जाणवलं आहे की, बाहेर उगाचच चर्चा पसरवल्या जात आहेत. भ्रम निर्माण करण्यात येत आहे. परंतु अशा प्रकारचे भ्रम निर्माण करु या सरकारच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. उत्तम पद्धतीने चाललेल सरकार अफवा आणि भ्रम निर्माण करुन अस्थिर राहील अशा भ्रमात राहू नये

संजय राऊत यांना संभ्रमावस्था पसरली असल्याचा प्रश्न करण्यात आला तसेच महाविकस आघाडीतील नेते सरकार पुर्णवेळ टिकणार असं नेहमी का सांगत आहेत. असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, मीडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केलं जात आहे. यामुळे वारंवार सांगावे लागत आहे. परंतु याच्यापुढे सांगण्याची वेळ येणार नाही कारण सर्वांना कृतीतूनच दिसेल की हे सरकार खंबीर आहे.

- Advertisement -

भेटीचे स्वातंत्र्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील ३ दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. तसेच राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही भेटले होते. याभेटीमुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांना रोजच भेटायचो परंतु आता मुख्यमंत्री आहेत कामाचा व्याप वाढला आहे. परंतु आमचे फोनवर संभाषण होत असते. आता शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देण्यात येत आहे. त्यांच्याविषयी बैठक घेण्यात आली होती या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित होते. पक्षाचा आमदार अडचणीत असेल तर त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपुर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी आहे. सगळ्या आमदारांचा आणि प्रताप सरनाईक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद आहे अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर थेट राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल २० मिनिट चर्चा केली आहे. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी म्हटलं आहे की, शरद पवार यांना सहज भेटलो, काहीही घडामोडी नाहीत. मुख्यमंत्र्यांना काही निरोप असेल तर तुम्हाला म्हणजेच मीडियाला सांगू, पवार साहेबांना सांगेन असे म्हणत हे सरकार ५ वर्ष पुर्ण करेल अस सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. परंतु राजकीय वर्तुळात आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी सुरु असल्याचे कळतं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -