घरक्रीडाCoronaVirus: भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा पण...

CoronaVirus: भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा पण…

Subscribe

केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचं बीसीसीायने केलं स्पष्ट

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे सामने तसेच आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचे सावट असल्याने देशातील सर्व व्यवहार तसेच खेळविश्वातील क्रिकेट पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत शंकाच आहे. दरम्यान कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचे सावट सध्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळानुसार आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचे बीसीसीायने स्पष्ट केले आहे. तसेच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यातला प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती केली होती. या दौऱ्यासाठी भारतीय संघाला क्वारंटाइन सुविधा तयार करुन देण्याची तयारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दाखवली असून या दौऱ्यातले सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासही श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तयार आहे.

- Advertisement -

जून-जुलैमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे, मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला या दौऱ्याबाबत गंभीरपणे विचार करण्यास सांगितले आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना असे सांगितले की, “लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतं आणि काय नियम आखून देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर भारती संघाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असेल तर आम्ही श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास तयार आहोत.”


CoronaEffect: भारतीय क्रिकेटपटूंच्या पगारातही होणार कपात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -