घरक्रीडास्टारफिशने पटकावली ३४ पदके

स्टारफिशने पटकावली ३४ पदके

Subscribe

डोंबिवली जिमखाना आणि म्हैसकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी तब्बल ३४ पदके पटकावण्याचा पराक्रम केला. स्टारफिशच्या खेळाडूंनी विविध गटांत २० सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदके मिळवली.

या स्पर्धेमध्ये १२ वर्षांखालील गटात सवर अकुसकरने ५ सुवर्णपदके आणि १ रौप्यपदकावर आपले नाव कोरले. १० वर्षांखालील गटात आदित्य घागने २ सुवर्ण, ईदांत चतुर्वेदीने १ सुवर्ण, ३ रौप्य, आर्या गडेने २ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य, रोहन अंबुरेने २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य मिळवले, तसेच ८ वर्षांखालील गटात आयुषी आखाडेने १ कांस्य, विहान चतुर्वेदीने ४ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले. ६ वर्षांखालील गटात फ्रेया शहाने १ सुवर्ण आणि ३ कांस्यपदके पटकावली. खुल्या गटात शांता आखाडेने १ सुवर्ण, आदेश ठाणेकरने २ सुवर्णपदके मिळवली . रिले प्रकारात आदित्य घाग, रोहन अंबुरे, विहान चतुर्वेदी, ईदांत चतुर्वेदी यांनी सुवर्णपदक पटकावले.

- Advertisement -

संपूर्ण स्पर्धेत सवर अकुसकर, रोहन अंबुरे, विहान चतुर्वेदी, आर्या गडे या जलतरणपटूंनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले, तर रनरअपचा किताबदेखील स्टारफिश फाऊंडेशनला मिळाला. या सर्व जलतरणपटूंना कैलास आखाडे, अतुल पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर व्यवस्थापक म्हणून मनोज कांबळे यांनीही सहकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -