घरक्रीडाT20 world cup 2021: 'जर-तर' च्या सामना, 'Birthday Boy' कोहलीला विजयाचे गिफ्ट

T20 world cup 2021: ‘जर-तर’ च्या सामना, ‘Birthday Boy’ कोहलीला विजयाचे गिफ्ट

Subscribe

टी-२० विश्वचषकात सुपर-१२ च्या लढतीसाठी शुक्रवारी भारत आणि स्कॉटलँड आमनेसामने असणार आहेत

टी-२० विश्वचषकात सुपर-१२ च्या लढतीसाठी शुक्रवारी भारत आणि स्कॉटलंड आमनेसामने असणार आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ‘जर तर’ च्या फेऱ्यात अडकलेला भारतीय संघ अजून एका करो या मरोच्या सामन्यात खेळताना पहायला मिळणार आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी स्कॉटलँडचा मोठ्या धावांनी पराभव करण्याची गरज आहे. कर्णधार पदाच्या कार्यकाळातील आपला शेवटचा विश्वकप खेळत असलेल्या विराट कोहलीचा शुक्रवारी म्हणजेच आज ५ नोव्हेंबरला जन्मदिवस आहे. तो ३३ वर्षांचा झाला आहे. जगभरातील प्रसिध्द खेळाडूंमधील एक असणारा विराट कोहली जन्मदिवसाच्या दिवशी एक अविस्मरणीय खेळी खेळेल अशी चाहत्यांची इच्छा आहे.

भारतीय संघाला स्कॉटलँडविरूध्दच्या सामन्यात फक्त विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने सामना जिंकून नेट रनरेट वाढवण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला आपल्या पहिल्या दोन्हीही सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे भारताचा नेट रनरेट कमी झाला आहे. भारताचे सुरू असलेल्या विश्वचषकात एकूण २ सामने राहिले आहेत ते दोन्हीही सामने संघासाठी करो या मरो असे असणार आहेत. कारण ग्रुप बी मधून पाकिस्तानने सलग ४ सामने जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे आणि न्यूझीलंड पण उपांत्य फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहे. न्यूझीलंडचा जर नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभव झाला तर भारताचे उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान कायम राहू शकते.

- Advertisement -

रोहित-राहुल सलामी जोडीवर मोठी जबाबदारी

रोहित, के.एल राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या या सगळ्यांनी अफगानिस्तानविरूध्दच्या सामन्यात चांगली खेळी केली होती. न्यूझीलंड सोबतचा सामना हरल्यानंतर संघातून बाहेर असलेल्या सुर्यकुमार यादवच्या संघातील पुनरागमनाने संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. तर सलामावीर जोडीने मागच्या सामन्यात शतकीय भागीदारी नोंदवून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही सलामीवीर फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

भारताचा आजचा संभावीत संघ

रोहित शर्मा, के.एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -