घरक्रीडाVideo : AUS VS PAK पाकिस्तान हरल्याचा फॅनला धक्का, व्हिडीओ व्हायरल

Video : AUS VS PAK पाकिस्तान हरल्याचा फॅनला धक्का, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्सला मोठा झटका बसला आपल्या संघाच्या पराभवामुळे दु:खी झालेले अनेक चाहते रडताना दिसले आणि अनेकांचे चेहरे कोमेजलेले पहायला मिळाले

टी-२० विश्वचषकात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्सला मोठा झटका बसला. आपल्या संघाच्या पराभवामुळे दु:खी झालेले अनेक चाहते रडताना दिसले आणि अनेकांचे चेहरे कोमेजलेले पहायला मिळाले. यासर्वांमध्ये एक फॅन्स असा पण होता तो मैदानातून बाहेर जायला तयार नव्हता. या फॅन्सची ओळख पाकिस्तानचा प्रसिध्द फॅन्स म्हणून आहे.
सध्या “ओ भाई…मारो मुझे मारो’ मुळे प्रसिध्द असलेल्या मोमीन शाकिबची व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत पाकिस्तानचा फॅन्स पराभवानंतर मैदानात निराश होऊन बसला आहे. तर एक जण शाकिबला उठवण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की शाकिब मैदानातून बाहेर जायला तयार होत नव्हता. एक जण त्याला जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न करत आहे. शाकिब मैदानाच्या पायऱ्यांवर बसल्याचे पहायला मिळते. पाकिस्तानच्या पराभवामुळे तो खूप भावूक झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

- Advertisement -

शाकिबने पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, “मला घरी जायचे नाही. सामना हरला म्हणजे दु:ख तर होईलच ना, पण चांगले क्रिकेट खेळलेत. सलग सामने जिंकत आले आहेत आणि ते आमचे चॅम्पियन्स आहेत आम्ही सगळेजण त्यांच्यावर प्रेम करतो”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

- Advertisement -

 

हसन अलीला ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

मोमीन शाकिबने पाकिस्तानच्या पराभवानंतर गोलंदाज हसन अलीला ट्रोल करणाऱ्यांना देखील उत्तर दिले आहे. शाकिबने सांगितले प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, पण आपण कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबावर किंवा त्याच्यावर वैयक्तिक टिका करू नये. २०१९ च्या विश्वचषकात शाकिबचा ‘मारो, मुझे मारो’ चा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर यावेळेस ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला.


हे ही वाचा : टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -