घरक्रीडाDronacharya award : हॉकीचे कोच सांगवान यांचे नाव वगळले; केंद्र सरकारने दिल्ली...

Dronacharya award : हॉकीचे कोच सांगवान यांचे नाव वगळले; केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिले उत्तर

Subscribe

हॉकीचे प्रशिक्षक संदीप सांगवान यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीतून हटवल्यानंतर केंद्र सरकारने यावर उत्तर दिले आहे

हॉकीचे प्रशिक्षक (coach) संदीप सांगवान यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीतून हटवल्यानंतर केंद्र सरकारने यावर उत्तर दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान सरकार कडून सांगितले की सागंवान यांना सोडून कित्येक नावे या यादीत होती. त्यामुळे त्यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आले. हॉकीचे प्रशिक्षक संदीप सांगवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून क्रिडा मंत्रालयाला त्यांचा निर्णय बदलण्याचा आग्रह केला होता. त्यामध्ये सांगवान यांना २०२१ च्या द्रोणाचार्य पुरस्कारापासून दूर ठेवण्यात आले होते.

सांगवान यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी केंद्र सरकारला निर्देश द्यायला सांगितले आणि याबाबतची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला निश्चित केली होती. सांगवान यांनी दावा केला होता की, ते प्रसिद्ध हॉकी प्रशिक्षक आहेत. क्रिडा पुरस्कार २०२१ च्या निवड समितीने द्रोणाचार्यसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पण यावर क्रिडा मंत्रालयाने दुर्लक्ष केले.

- Advertisement -

केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितले…

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले कि त्याच्यांकडे सांगवान यांच्यासारखी कित्येक नावे होती. त्यामुळे त्यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीतून हटवले. केंद्र सरकारकडून अनिल सोनी या सुनावणीत सहभागी झाले होते. सोनी यांनी म्हटले की या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते आणि आपल्या खेळाडूंनी खूप चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे निवड समितीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी बरोबर देखील होती मात्र, याशिवाय अन्य कोणत्याही पुरस्काराची संख्या वाढवण्याचे काही कारण नव्हते.

सोनी यांनी आणखी सांगितले, द्रोणाचार्य पुरस्कारांच्या संख्येनुसार योग्य व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यासाठी तीन श्रेणींमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आले आहेत. तर न्यायालयाने संबधित विभागाला सांगितले की गरज पडल्यास त्यांच्याकडून पुरावा म्हणून कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. ज्याच्या आधारावर द्रोणाचार्य पुरस्कार दिला आहे आणि याच्यासाठी तयार रहा.

- Advertisement -

हॉकीला सांगवान यांचे मोठे योगदान

संदीप सांगवान १५ वर्ष हॉकीचे प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी कित्येकवेळा भारताच्या राष्ट्रीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. सांगवान यांनी याचिकेत म्हटले होते की ज्या आकड्यांच्या आधारे त्यांचे नाव पुरस्काराच्या यादीतून वगळले आहे ते त्यांच्या समोर आले पाहिजे. तर त्यांनी हे देखील म्हटले की ज्यांना हा पुरस्कार दिला आहे त्यांनी सागंवान यांच्या तुलनेत अर्धे सुध्दा काम केले नाही.


हे ही वाचा : T20 world cup 2021: रागात बॅटवर मारला पंच अन् हात मोडला; न्यूझीलंडच्या खेळाडूची हिटविकेट


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -