घरक्रीडाDwayne bravo : ब्रावोचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास; ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणार शेवटचा सामना

Dwayne bravo : ब्रावोचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास; ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणार शेवटचा सामना

Subscribe

ब्रावोने श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यानंतर फेसबुक लाइवच्या कार्यक्रमात माजी कर्णधार डॅरेन सॅमी आणि समालोचक अॅलेक्स जॉर्डन सोबत बोलताना संन्यास घेण्याबाबत माहिती दिली

टी-२० विश्वचषकात सुपर १२ साठी गुरूवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेने २० धावांनी वेस्टइंडीजचा पराभव केला. या पराभवासोबतच गतविजेत्या वेस्टइंडीजचे स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. पराभवानंतर गतविजेत्या वेस्टइंडीडचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यात ब्रावो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ब्रावोने श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यानंतर फेसबुक लाइवच्या कार्यक्रमात माजी कर्णधार डॅरेन सॅमी आणि समालोचक अॅलेक्स जॉर्डन सोबत बोलताना संन्यास घेण्याबाबत माहिती दिली.

ड्वेन ब्रावोने सांगितले की, “मला वाटते की त्या क्षणाची वेळ आली आहे. माझे किकेटमधील प्रदर्शन चांगले राहिले आहे. १८ वर्ष वेस्टइंडीजतर्फे खेळताना खूप चढ-उतार पाहिले आहेत. पण जेव्हा मी या सगळ्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा इतका वेळ प्रदेश आणि कॅरिबियन लोकांचे प्रतिनिधित्व केल्याची मला संधी दिली त्या बद्दल मी खूप आभारी आहे. मी माझ्या संपूर्ण क्रिकेटच्या जीवनात ३ आयसीसी किताब जिंकले आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”.

- Advertisement -

ब्रावोने आणखी सांगितले की, “आम्हाला ज्याची अपेक्षा होती तसा हा विश्वचषक आमच्यासाठी गेला नाही. आम्हाला स्वत:ला दोष न देता संयम बाळगला पाहिजे, कारण ही एक कठीण स्पर्धा होती. माझ्याकडे आतापर्यंत जो काही अनुभव आहे त्याला मी संघातील युवा खेळाडूंसोबत घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वाटते की व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचे भविष्य उज्ज्वल आहे आणि आमच्यासाठी महत्त्वाचे आहे की आम्ही खेळाडूंचे समर्थन करत आहोत आणि त्यांना प्रोत्साहन करत राहणे.

३८ वर्षीय ब्रावोने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर त्याने २०१८ मध्ये पण संन्यासाची घोषणा केली होती. पण २०१९ मध्ये पुन्हा एकदा त्याने राजीनाम्यानंतर पुनरागमन केले होते. ब्रावोने आतापर्यंत वेस्टइंडीजसाठी एकूण २९४ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६४१३ धावा केल्या.सोबत ३६३ बळी देखील पटकावले आहेत.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -