घरक्रीडाT20wc : न्यूझीलंडला झटका, टी२० वर्ल्डकपमधून विलियमसन स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

T20wc : न्यूझीलंडला झटका, टी२० वर्ल्डकपमधून विलियमसन स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

Subscribe

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गैरी स्टीड याने खुलासा केला आहे की, दुखापतीमुळे संघाचा कर्णधार केन विलियमसन टी२० विश्वचषकातील काही सामन्यांनंतर स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडला बुधवारी सराव सामन्यादरम्यान इंग्लंडच्या संघाने १३ धावांनी पराभूत केलं आहे. विलियमसन सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिसला परंतु फलंदाजी केली नाही.

मुख्य प्रशिक्षक स्टीड याने सांगितले की, पहिल्या सराव सामना झाला त्यानंतर विलियमसनच्या हाताला झालेली जखम वाढली आहे. या सामन्यात विलियमसन याने ३७ धावा केल्या आहेत. परंतु न्यूझीलंडला ३ बाद असा पराभव स्वीकारावा लागला.

- Advertisement -

विलियमसन काही सामने संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. आम्हाला विश्वास आहे की, काही कालावाधीच्या विश्रांतीनंतर विलियमसनला आराम मिळेल आणि तो संघात वापसी करेल असे स्टीडने म्हटलं आहे.

न्यूझीलंडचा मंगळवारी पाकिस्तानशी सामना होणार आहे. मात्र बाकीचे सुपर-१२ सामने सात दिवसांमध्ये खेळावे लागणा आहेत. या सामन्यांमुळे विलियमसनला आराम मिळणे शक्य नाही. केन विलियमसन गोलंदाजांचा सामना करणारे फलंदाज आहे. तशाच प्रकारे तो तयारीही करतो परंतु काहीवेळा हे नुकसानदायक असते परंतु आम्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करु असं संघाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Twitter Live Cricket Scorecard : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी ट्विटरचे नवे फीचर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -