घरक्रीडा२०२१ मध्ये सर्वाधिक कसोटी सामन्याच्या क्रमवारीत भारतीय संघ अग्रस्थानी, पाकिस्तानलाही टाकलं मागे

२०२१ मध्ये सर्वाधिक कसोटी सामन्याच्या क्रमवारीत भारतीय संघ अग्रस्थानी, पाकिस्तानलाही टाकलं मागे

Subscribe

सेंच्युरीयनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत केलं आहे. भारताचा कर्णधार विराटने कोहलीने सुद्धा अनेक रेकॉर्ड केले आहेत. संघाने पाकिस्तानला कसोटी सामन्यात मागे टाकलं आहे. भारताने २०२१ मध्ये ८ व्या कसोटी सामन्यात बाजी मारली आहे. यासह भारतीय संघ या वर्षातील सर्वात यशस्वी कसोटी संघ बनला आहे. या कसोटीपूर्वी भारत-पाकिस्तान ७-७ सामने जिंकून बरोबरीत होते. तर इंग्लंडने चार सामने जिंकले आहेत.

भारताच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्लाही धुळीस मिळाला आहे. २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियन येथे कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने आफ्रिकेचा २८१ धावांनी पराभव केला. त्यानंतर आफ्रिकन संघाचा या मैदानावरील हा तिसरा पराभव ठरला आहे. सेंच्युरियनमधील विजय हा भारतीय संघाचा या वर्षातील सर्वात मोठा विजय आहे.

- Advertisement -

वर्षाच्या सुरुवातीला भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील गाबा येथे ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं होतं. सप्टेंबरमध्ये कोहली आणि कंपनीने केनिंग्टन ओव्हलवर इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव केला. याच मैदानावर भारताने ५० वर्षानंतर कसोटी सामना जिंकला होता.

- Advertisement -

कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली यशस्वी कर्णधार ठरला आहे. कोहलीने आफ्रिका संघाविरूद्ध आतापर्यंत एकूण चार कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे आणि दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ ५४ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ ३६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.


हेही वाचा : IND vs BAN: अंडर-१९ टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत फायनलमध्ये, बांगलादेशवर १०३ धावांनी मात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -