घरक्रीडाटीम इंडिया जागे व्हा, पाकला मदत करा!

टीम इंडिया जागे व्हा, पाकला मदत करा!

Subscribe

पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांना सुरुवातीच्या ५ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकण्यात यश आले होते, परंतु न्यूझीलंड आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे त्यांना या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यांचे आता ७ सामन्यांत ७ गुण झाले आहेत.

मात्र, ते आगेकूच करणार का, हे त्यांच्या निकालांसोबतच इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून आहे. गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर असणार्‍या इंग्लंडच्या खात्यात ७ सामन्यांनंतर ८ गुण आहेत. त्यांनी जर पुढील दोन्ही सामने गमावले, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकेल. इंग्लंडचा पुढील सामना रविवारी भारताशी होणार आहे. या सामन्यात भारत इंग्लंडचा पराभव करून पाकिस्तानला मदत करेल अशी शोएब अख्तरला आशा आहे.

- Advertisement -

विश्वचषकात आगेकूच करण्यासाठी पाकिस्तानला भारताच्या मदतीची गरज आहे आणि ते मदत करतील अशी मला आशा आहे. त्यांनी जर इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला, तर इंग्लंडचा संघ विश्वचषकातून बाहेर जाईल आणि पाकिस्तान ११ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. पाकिस्तानने दमदार पुनरागमन केले आहे. मात्र, आता भारतीय संघाने पाकिस्तानला मदत केली पाहिजे. भारतीय खेळाडूंनो जागे व्हा! तुम्ही (भारत) इंग्लंडवर मात करा, आम्ही (पाकिस्तान) आमचे दोन सामने जिंकतो, जेणेकरून आपण उपांत्य फेरीत भेटू आणि तिथे आम्ही तुमचा पराभव करू, असे अख्तर म्हणाला.

पाकिस्तानचा यापुढील सामना शनिवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्याविषयी अख्तरने सांगितले, पाकिस्तानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामना जिंकल्यास पाकिस्तान संघाचे कौतुक होईल आणि गमावल्यास त्यांच्यावर टीका होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -