घरक्रीडा...अखेर 'त्या' प्रकरणात टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा कायदेशीर विजय

…अखेर ‘त्या’ प्रकरणात टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा कायदेशीर विजय

Subscribe

सोमवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीत न्यायाधीशांनी जोकोविचच्या बाजूने निकाल देत व्हिसा रद्द न करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्याला तात्काळ डिटेन्शन सेंटरमधून अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ आता गतविजेता आणि सर्वाधिक नऊ वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दहाव्या विजेतेपदासाठी लढणार आहे.

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोवाक जोकोविचने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवर आपला वरचष्मा कायम ठेवलाय. सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे हे युद्ध न्यायालयाबाहेर ऑस्ट्रेलियन सरकारशी होते. आपले विजेतेपद वाचवण्यासाठी मेलबर्नला पोहोचलेल्या जगातील नंबर वन खेळाडूला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विमानतळावरच थांबवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे जोकोविचलाही तिथेच अडकून पडावे लागले. तसेच डिटेन्शन सेंटरमध्ये पाच रात्री काढाव्या लागल्यात. आता जोकोविचला कोरोना लसीशी संबंधित संपूर्ण प्रकरणावर कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय.

व्हिसा रद्द न करण्याचे आदेश

सोमवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीत न्यायाधीशांनी जोकोविचच्या बाजूने निकाल देत व्हिसा रद्द न करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्याला तात्काळ डिटेन्शन सेंटरमधून अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ आता गतविजेता आणि सर्वाधिक नऊ वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दहाव्या विजेतेपदासाठी लढणार आहे.

- Advertisement -

ऑनलाईन सुनावणीत काय झाले?

भारतीय वेळेनुसार पहाटे 4.30 वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. ज्यानंतर न्यायालयाचे लाईव्ह स्ट्रीमिंग क्रॅश झाले, काही वेळाने ते पुन्हा सुरू झाले. एका न्यायाधीशाने जोकोविचचे वकील निक वुड यांना विचारले, ‘प्रश्न हा आहे की तो आणखी काय करू शकतो.’ जोकोविचच्या वकिलाने कबूल केले की, तो आणखी काही करू शकत नाही. ते म्हणाले की, जोकोविचने अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला की त्याने ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी जे काही केले ते योग्य होते.

ऑस्ट्रेलियन सरकार अजूनही ठाम

कोर्टाच्या आदेशानंतरही ऑस्ट्रेलियन सरकारचे गृहमंत्री आपला पराभव मानायला तयार नाहीत. जोकोविचला ऑस्ट्रेलियातून बाहेर पाठवण्याचा अधिकार सरकारकडे अजूनही आहे, असे ते मानतात. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत, या अंतर्गत व्हिसा रद्ददेखील केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत लवकरच निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन ओपन 17 जानेवारीपासून सुरू होणार

बेलग्रेडमध्ये त्याच्या चाहत्यांनी जोकोविचच्या समर्थनार्थ रॅली काढली, ज्यामध्ये त्याच्या पालकांनीही भाग घेतला. ऑस्ट्रेलियन ओपन 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जोकोविचची आई जोकोविच म्हणाली, ‘आजचा दिवस मोठा होता. आज संपूर्ण जगाने सत्य ऐकले. त्याच वेळी जोकोविचवर अमानवी वागणूक केल्याचा आरोपही होता. त्याची आई म्हणाली, ‘नोवाकने त्याला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते तिथे नाश्ताही केला नाही. तो खोली सोडू शकत नव्हता किंवा उद्यानाकडे पाहू शकत नव्हता.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

5 डिसेंबरला मेलबर्नमध्ये आल्यावर ऑस्ट्रेलिया सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला, कारण त्याने कोरोना लसीकरण नियमांमधील वैद्यकीय सवलतीचे निकष पूर्ण केले नव्हते. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोविड 19 चे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. परंतु जोकोविचने असा युक्तिवाद केला की, त्याला लसीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. कारण त्याच्याकडे गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा पुरावा होता आणि त्याच्याकडे अँटीबॉडीज आहेत. त्यानंतर जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सर्किट आणि फॅमिली कोर्टात व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -