घरक्रीडाचेरोबा क्रीडा मंडळाची आगेकूच

चेरोबा क्रीडा मंडळाची आगेकूच

Subscribe

ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी

चेरोबा क्रीडा मंडळ, कै. शिवाजी क्रीडा मंडळ या संघांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील पुरुष द्वितीय श्रेणी स्थानिक गटाची उपांत्य फेरी गाठली. ठाण्याच्या अनिल शंकर जाधव क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत कै. शिवाजी क्रीडा मंडळाने चुरशीच्या लढतीत वीर तानाजी क्रीडा मंडळाला २८-२७ असे पराभूत केले. मध्यंतराला ९-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या कै. शिवाजी मंडळाने दमदार पुनरागमन करत हा सामना जिंकला. त्यांच्याकडून शुभम आणि पंकज डबरे यांनी अप्रतिम खेळ केला.

दुसर्‍या सामन्यात चेरोबा क्रीडा मंडळाने चिंतामणी क्रीडा मंडळावर २३-१९ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्याच्या विश्रांतीला चेरोबाकडे ९-७ अशी आघाडी होती. अजय म्हात्रे आणि हिमांशू पाटील यांनी चतुरस्त्र खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चिंतामणीच्या चेतन कदम आणि मुकेश बाबू यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही.

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिका अंतिम फेरीत

व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत नवी मुंबई महानगरपालिकेने जॉयकुमार अँड कंपनीचा ३१-३० असा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. सुरज धुंदले, प्रथमेश निगीरे यांनी आक्रमक सुरुवात केल्याने पहिल्या डावात पालिकेकडे २१-१० अशी भक्कम आघाडी होती. उत्तरार्धात जॉयकुमार अँड कंपनीने आपल्या खेळात सुधारणा करत सामन्यात रंगत आणली. मात्र, अखेरच्या क्षणांत पालिकेने चांगला खेळ करत हा सामना जिंकला. आता या गटाच्या अंतिम फेरीत त्यांच्यासमोर ठाणे महानगरपालिकेचे आव्हान असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -