घरक्रीडाऐतिहासिक कामगिरीचे लक्ष्य! - श्रेयस अय्यर

ऐतिहासिक कामगिरीचे लक्ष्य! – श्रेयस अय्यर

Subscribe

आमचे ऐतिहासिक कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे, असे तब्बल ७ वर्षांनी आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश करणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला. दिल्ली आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघांमध्ये बुधवारी ‘प्ले-ऑफ’मधील बाद फेरीचा सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ‘पात्रता फेरी २’च्या सामन्यात खेळेल आणि तो सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. दिल्लीच्या संघाला अजून एकदाही आयपीएलची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे पुढील दोन सामने जिंकत दिल्लीला इतिहास रचण्याची संधी आहे.

आयपीएलच्या या मोसमात आम्ही अप्रतिम कामगिरी केली आहे. आम्ही ९ साखळी सामने जिंकले, तर जे ५ सामने गमावले तेही फार धावांच्या फरकाने. जिंकलेल्या सामन्यांपैकी बरेचसे सामने हे आम्ही सहजपणे जिंकले. आमच्या संघाने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावल्याचा मला आनंद आहे. मात्र, हा भूतकाळ झाला आणि आता बाद फेरीत चांगली कामगिरी करण्याचे आमचे लक्ष्य आहे. हैद्राबादविरुद्धचा सामना आव्हानात्मक असणार आहे. मात्र, आमचा संघ या सामन्यासाठी तयार आहे. आम्ही तब्ब्ल ७ वर्षांनी बाद फेरी गाठत इतिहास रचला आहे, पण त्यामुळे आम्ही ज्याप्रकारे खेळतो त्यात काही बदल करू किंवा काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करू असे नाही.

- Advertisement -

आम्ही हैद्राबादचा हैद्राबादमध्ये पराभव केला होता, तर त्यांनी आम्हाला दिल्लीमध्ये पराभूत केले. त्यामुळे हा जिंकण्याचा दोन्ही संघांना विश्वास असेल. त्यांच्या संघात काही महत्त्वाचे खेळाडू नाहीत, तर आमच्या संघात कागिसो (रबाडा) नाही. त्यामुळे दोन्ही संघांची सारखीच स्थिती आहे. हैद्राबादने याआधी अशा सामन्यांत चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, आता हैद्राबादला हरवत ऐतिहासिक कामगिरी करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे श्रेयस म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -