घरक्रीडासनरायजर्स हैदराबाद संघात टी नटराजनऐवजी उमरान मलिक खेळणार

सनरायजर्स हैदराबाद संघात टी नटराजनऐवजी उमरान मलिक खेळणार

Subscribe

२२ सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापुर्वी नटराजन कोरोनाबाधित आढळला होता.

आयपीएल २०२१ दुसऱ्या सत्रामध्ये सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना सकारात्मक आढळल्यामुळे त्याला विलगीकरणात ठेवलं आहे. टी नटराजन याच्या जागी संघात जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकला संघात सामील करण्यात आले आहे. उमरान मलिक याने यापुर्वी जम्मू काश्मीरसाठी एक टी-२० सामना खेळला आहे. तसेच लिस्ट ए सामन्यात एकूण ४ गडी बाद केले आहेत. हैदराबाद संघाकडून दिलेल्या माहितीनुसार सनरायजर्स हैदराबादने आयपीएल २०२१ साठी टी नटराजन याच्या जागी अल्पकालीन बदली म्हणून उमरान मलिक याला सामील करण्यात येत आहे. २२ सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापुर्वी नटराजन कोरोनाबाधित आढळला होता.

टी नटराजन याच्या जागी घेण्यात आलेला २१ वर्षीय उमरान मलिक नेट गोलंदाज म्हणून पुर्वीपासूनच सनरायजर्स हैदराबादचा भाग आहे. नटराजन कोरोनाबाधित आढळला असल्यामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नटराजन बायोबबलमध्ये परत येईपर्यंत उमरान मलिक संघाकडून खेळेल.

- Advertisement -

वैद्यकीय पथकाने टी नटराजनच्या संपर्कातील सहा जणांना आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विजय शंकर, विजय कुमार ( संघ व्यवस्थापक), श्याम सुंदर जे (फिजिओथेरापिस्ट), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), पेरियासॅमी गणेसन (नेट बॉलर) आदींना आयसोलेट करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांसाठी अतिशय कडक नियमावली आणि व्यवस्थापन करूनही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रकरण समोर आले आहे. याआधीच बीसीसीआयने कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आयपीएल २०२१ चा आधीचा हंगाम तात्पुरता रद्द केला होता. अनेक चर्चा आणि बैठकानंतर आयपीएल व्यवस्थापनाने आयपीएलचा उर्वरीत हंगाम हा दुबईला पुर्ण करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा : भारत दौऱ्याला कोणी नकार देईल का ? ख्वाजाचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -