घरक्रीडास्वातंत्र्य दिनी विराटचे भारतीयांना गिफ्ट; चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी

स्वातंत्र्य दिनी विराटचे भारतीयांना गिफ्ट; चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी

Subscribe

स्वातंत्र्य दिनी विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. विराटने आपल्या कारकिर्दीतील ४३ वे शतक पटकावले आहे.

देशभरात उत्साहात ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील स्वातंत्र्य दिनी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठे गिप्ट दिले आहे. बुधवारी वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फक्त सामनाच नाही तर वन-डे मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे विराटने या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याने ९९ चेंडूत ११४ धावा केल्या. त्यामुळे विराट चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली. कोहलीने केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे भारताला यश मिळाले. याशिवाय कोहलीने वन-डे विश्वात आपले ४३ वे शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे विराट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – भारताची वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सनी मात

- Advertisement -

सचिनच्या बरोबरीला विराटची कामगिरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड विराट कोहली नक्की तोडेल, अशी शक्यता बऱ्याच चाहत्यांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या विराटने सचिनच्या एका रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. एकाच संघा विरोधात सर्वाधिक शतक करण्याच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरांचा पहिला नंबर होता. सचिनने ऑस्ट्रेलिया विरोधात नऊ वेळा शतक केले आहेत. तर विराटने देखील वेस्ट इंडिजच्या विरोधात नऊ वेळा शतक पटकावले आहे. बुधवारी वेस्ट इंडिज विरोधातील विराटचे वन-डे सामन्यातील ४३ वे शतक होते, तर वेस्ट इंडिज विरोधात हे विराटचे नऊवे शतक होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -