घरक्रीडाIND vs WI : भारताची वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सनी मात

IND vs WI : भारताची वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सनी मात

Subscribe

भारताने वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सनी मात केली आहे. याशिवाय तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० च्या फरकाने मालिकेवर आपले नाव रोवले आहे.

भारताने वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सनी मात केली. या विजयासह भारताने २-० च्या फरकाने ३ वन-डे सामन्यांची मालिकाही खिशात घातली आहे. शेवटच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि भारताचा तरुण तडफदार नवोदित अष्टपैलू खेळाडू श्रेयस अय्यरची कामगिरी महत्त्वाची ठरली. कारण दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. विराटने नाबाद ११४ धावा केले. तर श्रेयसने ६५ धावा केले. त्यामुळे वेस्ट इंडिजने दिलेले २५५ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र थोड्या वेळाने पाऊस बंद झाल्यामुळे सामना पुन्हा सुरु झाला. मात्र, पावसामुळे १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला.

नाणेफेक जिंकून विंडिजचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

तिसऱ्या वन-डे सामन्यात विडींजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताला. वेस्ट इंडिजची सुरुवात जोरदार झाली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटससाठी ११५ धावांची भागीदारी केली. मात्र, चहलने लुईसला माघारी पाठवले. यानंतर गेलही तंबूत परतला. गेल बाद झाल्यानंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. बपराच काळ पाऊस पडल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. वेस्ट इंडीजने २४० धावा केल्या. मात्र, डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला २५५ धावाचे आव्हान देण्यात आले.

- Advertisement -

विराटची नाबाद खेळी

वेस्ट इंडिजने दिलेल्या २५५ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर धावबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिखर धवन आणि ऋषभ पंत एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यरने विराट कोहलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस ६५ धावांवर बाद झाला. त्यानंतर केदार जाधवच्या सहाय्याने विराट कोहलीने वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान पूर्ण केले आणि वन-डे मालिकेच्या विजयावर भारताचे नाव रोवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -