घरक्रीडाVirat Kohli : विराटचा १०० कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय, PCA चे स्पष्टीकरण

Virat Kohli : विराटचा १०० कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय, PCA चे स्पष्टीकरण

Subscribe

भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान ४ मार्चपासून मोहालीच्या पीसीए आयएएस बिंद्रा स्टेडियममध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा विराट कोहलीचा १०० कसोटी सामना आहे. पण हा कसोटी सामना बघण्यासाठी मात्र प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. कोणत्याही प्रेक्षकांशिवायच हा सामना खेळवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सीईओ दीपक शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला स्पष्ट केले की, भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान पहिला सामना हा कोणत्याही प्रेक्षकांशिवायच खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा मोहालीत होणार आहे. तर दुसरा सामना बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.

- Advertisement -

विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे. रोहित शर्मा आपल्या कसोटी क्रिकेटमधील १०० वा सामना खेळणार आहे. कोहलीने आतापर्यंतच्या ९९ सामन्यांमध्ये ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या केल्या आहेत. या धावांमध्ये एकुण २७ शतकांचा समावेश आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -