घरक्रीडाविराट कोहलीने डिलीट केला १०वीच्या मार्कशीटचा फोटो, कॅप्शनसहीत फोटोही व्हायरल

विराट कोहलीने डिलीट केला १०वीच्या मार्कशीटचा फोटो, कॅप्शनसहीत फोटोही व्हायरल

Subscribe

आयपीएलच्या १६ व्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. यावेळी आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. परंतु भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. विराट कोहलीने १०वीच्या मार्कशीटचा फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने १० वीच्या मार्कशीटचा फोटो शेअर केला होता. मात्र, कोहलीने काही वेळानंतर त्याची ही पोस्ट डिलीट केली आहे. परंतु कोहलीने मार्कशीटचा फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. किती विचित्र गोष्ट आहे ना, की तुमच्या मार्कशीटमध्ये ज्या गोष्टी सर्वात कमी दिसत आहेत त्या तुमच्या कॅरेक्टरमध्ये सर्वाधिक आहेत. या पोस्टद्वारे कोहलीने त्याच्या गणितातील गुणांकडे लक्ष वेधले. ज्यामध्ये त्याला उर्वरित विषयांच्या तुलनेत सर्वात कमी गुण आहेत.

- Advertisement -

विराट कोहलीने २००४ साली १० वीची परीक्षा दिली होती. इयत्ता १० वीत विराट कोहलीने इंग्रजीत ८३, हिंदीत ७५, गणितात ५१, विज्ञानात ५५, सामाजिक शास्त्रात ८१ आणि इंट्रोडक्टरी विज्ञानात ५८ गुण मिळवले होते. कोहली १०वीत ६९ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा : विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने मांडली भूमिका, पर्याय सूचवत BCCIवर साधला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -