Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा त्याला स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास; राशिदने सांगितले विराट कोहलीच्या यशाचे रहस्य

त्याला स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास; राशिदने सांगितले विराट कोहलीच्या यशाचे रहस्य

कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत.

Related Story

- Advertisement -

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा कोहली हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे. तसेच त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. फलंदाज म्हणून कोहलीच्या या यशामागे त्याला स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास हे मुख्य कारण असल्याचे अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानला वाटते. कितीही उत्कृष्ट गोलंदाज समोर असला, तरी कोहली त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात, पद्धतीत बदल करत नाही. त्यामुळेच त्याला इतके यश मिळत असल्याचे राशिद म्हणाला.

वेगळे फटके मारत नाही

गोलंदाज सातत्याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असल्यास फलंदाजावर दडपण येते. परंतु, ही गोष्ट कोहलीला लागू होत नाही. तुम्ही कितीही चांगली गोलंदाजी केली, तरी तो स्वीप किंवा स्लॉग स्वीपसारखे फटके मारत नाही. कोणते फटके मारल्यास आपण धावा करू शकतो हे कोहलीला ठाऊक आहे. त्याची खेळण्याची वेगळी पद्धत आहे आणि तो त्यात बदल करत नाही. तो उगाचच वेगळे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाही, असे राशिद म्हणाला.

…त्यामुळेच तो इतका यशस्वी

- Advertisement -

गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असल्यास कोहली त्याला मान देतो. परंतु, तुम्ही खराब चेंडू टाकल्यास कोहली चेंडू सीमारेषेबाहेर पाठवतो. त्याला स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे. काही फलंदाजांना स्वतःवर विश्वास नसतो आणि म्हणूनच ते धावा करण्यात अपयशी ठरतात. मात्र, कोहलीला स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास असून त्यामुळेच तो इतका यशस्वी ठरला आहे, असे राशिदने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -