घरक्रीडाभारतीय 'रन मशीन' भुवनेश्वरपेक्षाही 'या' बाबतीत कमी

भारतीय ‘रन मशीन’ भुवनेश्वरपेक्षाही ‘या’ बाबतीत कमी

Subscribe

विराट कोहलीचा इंग्लंडमधील टेस्ट मॅचची सरासरी ही भारतीय पेसर भुवनेश्वर कुमारपेक्षाही कमी आहे. त्यामुळं विराटच्या नावे असाही एक रेकॉर्ड आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन क्रिकेट जगामध्ये ‘रन मशीन’ नावानं ओळखला जातो. विराट फॉर्ममध्ये असताना कोणाताही बॉलर त्याला थांबवू शकत नाही असं मानलं जातं. मागच्या दोन वर्षात विराटनं आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. विराट कोहली पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कॅप्टन्सी करणार आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या ‘रन मशीन’चा इंग्लंडचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा इंग्लंडमधील टेस्ट मॅचची सरासरी ही भारतीय पेसर भुवनेश्वर कुमारपेक्षाही कमी आहे. महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये २०१४ मध्ये इंग्लंड दौरा करण्यात आला होता. त्यावेळी विराट एक मजबूत बॅट्समन होता. तरीही विराट त्यावेळी संपूर्ण दौऱ्यात फ्लॉप ठरला होता. त्यावेळी त्याच्यावर जबरदस्त टीका करण्यात आली होती.

भुवीची सरासरी विराटपेक्षाही जास्त

या सिरीजमध्ये भुवनेश्वर कुमार अर्थात भुवीनं २७.४४ च्या सरासरीनं २४७ रन्स बनवले होते. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. मात्र विराट कोहलीनं यापेक्षाही कमी सरासरीनं रन्स बनवल्या होत्या. त्यामुळं या खराब कामगिरीबाबतही विराटचा एक रेकॉर्ड बनला आहे.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये विराट फ्लॉप

महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीदरम्यान २०१४ मध्ये केलेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात भारताला ३-१ अशी हार पत्करावी लागली होती. कोहली या सिरीजमध्ये पाच टेस्टमध्ये खेळला होता. त्यानं केवळ १३.२० च्या सरासरीनं केवळ १३४ रन्स बनवले. दोन वेळा तर शून्यावर कोहली आऊट झाला. या सिरीजमध्ये केवळ ३९ रन्स ही सर्वोच्च धावसंख्या होती. या सिरीजनंतर मात्र विराटनं स्वतःच्या खेळात सुधारणा करत नवे रेकॉर्ड्स बनवले. सध्या विराटचा फॉर्म चांगला असून इंग्लंडच्या दौऱ्यात विराट काय कमाल करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -