घरIPL 2020IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आमचा खेळ निराशाजनक - डिव्हिलियर्स

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आमचा खेळ निराशाजनक – डिव्हिलियर्स

Subscribe

आरसीबीने हा सामना ५९ धावांनी गमावला. 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात बंगळुरूला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना बंगळुरूला केवळ १३७ धावाच करता आल्याने त्यांनी हा सामना ५९ धावांनी गमावला. बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही, तर गोलंदाजीत केवळ मोहम्मद सिराजला दोन विकेट घेता आल्या. तसेच क्षेत्ररक्षणातही त्यांनी काही झेल सोडले. त्यामुळे आम्ही या सामन्यात केलेला खेळ निराशाजनक होता, असे बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सने मान्य केले.

२० धावा जास्तच दिल्या

या खेळपट्टीवर १९६ धावा फार नव्हत्या. आम्ही या धावा करू शकत होतो. फलंदाजीत दिल्लीने पहिल्या सहा षटकांत अप्रतिम सुरुवात केली, पण त्यानंतर आम्हाला त्यांना रोखण्यात यश आले. आम्ही धावा रोखण्यावर लक्ष केंद्रित करून थोडी बचावात्मक गोलंदाजी करणे गरजेचे होते. ते आम्ही केले, पण थोडे उशिराने. आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही. गोलंदाजीत आम्ही २० धावा जास्तच दिल्याचे एबी म्हणाला.

- Advertisement -

योजनेनुसार गोलंदाजी केली नाही

आमच्या पराभवाला काही गोष्टी कारणीभूत होत्या. सर्वात आधी दिल्लीने चांगली फलंदाजी केली आणि त्यांना श्रेय मिळालेच पाहिजे. आम्हाला त्यांच्यावर दबाव टाकण्याची संधी होती, पण आम्हाला योजनेनुसार गोलंदाजी करता आली नाही. आम्ही या सामन्यात निराशाजनक खेळ केला. आम्ही काही झेलही सोडले. त्यामुळे दिल्लीने २०-३० धावा अधिक केल्या. फलंदाजीतही आम्हाला चांगला खेळ करता न आल्याचेही एबीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -