घरक्रीडाया पराभवाबाबत काय बोलावे?

या पराभवाबाबत काय बोलावे?

Subscribe

आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबने दिलेल्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १६ व्या षटकात दिल्लीची ३ बाद १४४ अशी धावसंख्या होती आणि त्यांना जिंकण्यासाठी २१ चेंडूंत २३ धावांची गरज होती. मात्र, सॅम करन आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केल्यामुळे दिल्लीचा डाव १५२ धावांत आटोपला. दिल्लीने ८ धावांतच अखेरच्या ७ विकेट गमावल्या. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला या पराभवाबाबत काय बोलावे असा प्रश्न पडला.

या पराभवाबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि अशाप्रकारे विकेट गमावणे आम्हाला महागात पडले. मी खूपच निराश आहे. आम्ही चांगली फलंदाजी करत होतो. एकेवेळी चेंडू आणि गरज असलेल्या धावा यांच्यात काहीही फरक नव्हते. त्यामुळे आम्हाला त्यावेळी हुशारीने खेळ करण्याची गरज होती आणि आम्ही तसे केले नाही. पंजाबने या सामन्यात आमच्यापेक्षा चांगले प्रदर्शन केले. जेव्हा संयमाने खेळ करण्याची गरज होती, तेव्हा त्यांनी तो केला आणि त्यामुळेच त्यांनी हा सामना जिंकला. आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही, असे सामन्यानंतर अय्यर म्हणाला.

- Advertisement -

दुसरीकडे पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर खूप खुश होता. तसेच दिल्लीची ३ बाद १४४ अशी धावसंख्या असताना फॉर्मात असलेला रिषभ पंत फलंदाजी करत होता. तो कधी चूक करतो याची आम्ही वाट पाहत होतो, असे अश्विनने सांगितले. रिषभने त्या (१६ व्या) षटकात षटकार लगावला, त्यावेळी आम्हाला संयम ठेवणे गरजेचे होते आणि आम्ही ते केले. या विजयाचे श्रेय सॅम करन आणि शमीला जाते. आम्ही फलंदाजीत २५ धावा कमी केल्या होत्या, पण आम्ही चांगली गोलंदाजी करू याचा मला विश्वास होता. तसेच आम्हाला प्रेक्षकांनीही खूप प्रोत्साहन दिले. आमच्यासाठी हा अनुभव नवा आहे. याआधी मोहालीमध्ये इतके प्रेक्षक मी पाहिले नव्हते, असे अश्विन म्हणाला.

दिल्ली कॅपिटल्स की डेअरडेविल्सच !

- Advertisement -

दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमाआधी आपले नाव बदलले. पहिले ११ मोसम दिल्ली डेअरडेविल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघाने आपले नाव दिल्ली कॅपिटल्स असे केले. दिल्लीला ११ मोसमांत एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे दिल्लीला नावाबरोबरच आपले प्रदर्शनही बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र, पंजाबविरुद्धचा सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने त्यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले. या सामन्यात पुन्हा एकदा दिल्ली डेअरडेविल्सला खेळताना पाहून बरे वाटले, असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -