घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : बी. साईप्रणितचे आव्हान संपुष्टात

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : बी. साईप्रणितचे आव्हान संपुष्टात

Subscribe

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष गटाच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात बी. साईप्रणितला डेन्मार्कच्या जपानच्या केंटो मोमोटोने पराभूत करत स्पर्धेबाहेर केले आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणितला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून जपानच्या केंटो मोमोटोने नमवत बाहेर केले आहे. केंटोने १२-२१ आणि १२-२१ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभूत करत बी. साईप्रणितला सामन्याबाहेर केला आहे.

असा झाला सामना

जपानच्या केंटो मोमोटो आणि बी. साईप्रणित यांच्यातीव सामना ३९ मिनीटे चालला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच केंटो मोमोटोने सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले. पहिला सेटमध्ये मोमोटोने १२-२१ च्या फराकाने साईप्रणितला नमवत सामन्यात १-० ची विजयी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही साईप्रणितला १२-२१ च्या फरकाने पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.

- Advertisement -

आता आशा पी. व्ही. सिंधूवर

सकाळी सायनाच्या आणि आता साईप्रणितच्या पराभवानंतर आता सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा पी व्ही सिंधूवर लागून राहिल्या आहेत. सिंधूचा उपांत्यपूर्वफेरीतील सामना सध्या जपानच्या नोझुमी ओकुहरा विरूद्ध सुरू असून सर्व चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे लागून राहीले आहे.

p v sindhu
पी. व्ही. सिंधू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -