गुगल मॅपवर ‘टु व्हिलर’साठी नवं फिचर

भारतात ७० टक्केहून अधिक लोक टू व्हिलर वापरल्या जातात.या नव्या फिचरमधून टु व्हिलर पटकन जाऊ शकतील असे मार्ग दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे टु व्हिलरधारकांचा वेळ वाचू शकेल.

google map
प्रातिनिधिक फोटो

हल्ली कुठेही जायचं म्हटलं तर पत्ता शोधण्याचा त्रास होत नाही. कारण मदतीला गुगल मॅप्स नावाचे मॅप असते. अचूक पत्ता दाखवणाऱ्या गुगल मॅपचा सर्वाधिक वापर हल्ली केला जातो. ओला, उबर सारख्या टॅक्सी सर्व्हिस देणारे अॅप देखील गुगल मॅप्सचाच वापर करतात. इच्छित स्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ, ट्राफिक या सगळ्याचा अंदाज आपल्याला या गुगल अॅपवर मिळून शकतो. पण आता गुगल मॅपवर ‘टु व्हिलर’ साठी एक नव फिचर आले आहे. नुकतीच ही माहिती गुगलने चंदिगढ येथील एका कार्यक्रमात दिली आहे.

नेमकं काय आहे नवं फिचर ?

गुगल मॅप इडिंयाने हे नव फिचरं आणले आहे. भारतात ७० टक्केहून अधिक लोक टू व्हिलर वापरल्या जातात.या नव्या फिचरमधून टु व्हिलर पटकन जाऊ शकतील असे मार्ग दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे टु व्हिलरधारकांचा वेळ वाचू शकेल. या आधी फक्त चारचाकी आणि बससाठी हा पर्याय होता. पण आता टु व्हिलरसाठी हा पर्याय आणल्यामुळे आता गुगल मॅपवर कसा दिसेल हे पण बघणे महत्त्वाचे असणार आहे.

लवकरच प्रसाधनगृहे देखील दिसणार मॅपवर

प्रवासात निघताना प्रसाधनगृहे शोधणे पण कठीण होते. आता ही काळजी करण्याची गरज नसल्याचे गुगल मॅपच्या या कार्यक्रमात सांगण्यात आले आहे. लवकरच मॅपवर सार्वजनिक प्रसाधनगृहांचा पर्याय दिसणार आहे. तुमच्या मार्गावर सार्वजनिक प्रसाधनगृहांचा पर्याय समाविष्ट करण्याचा गुगलचा मानस असून या संदर्भात सरकारशी बोलणी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. ही संमती मिळाल्यानंतर मग देशातील अनेक शहरांमध्ये हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात असल्याचे देखील सांगण्यात आले.

रिअल टाईम बस

कोलकाता आणि सुरत या ठिकाणी रिअल टाईम बसचा पर्याय गुगल मॅपवर समाविष्ट करण्यात आला आहे. पण गरज पाहून आणखी काही महत्त्वांच्या शहरांमध्ये रिअल टाईम बसचा पर्यात समाविष्ट करण्यात येईल.