घरताज्या घडामोडीoxygen gas: ऑक्सिजनसाठीचा कोल्हापूर पॅटर्न नक्की काय आहे? जाणून घ्या

oxygen gas: ऑक्सिजनसाठीचा कोल्हापूर पॅटर्न नक्की काय आहे? जाणून घ्या

Subscribe

गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट कसा आहे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधांचाही रुग्णवाढीमुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अशामध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये राज्यसरकारची दमछाक झाली आहे. ऑक्सिजन गॅस लीक झाल्यामुळे बुधवारी नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झलाय. यानंतर आता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीसाठी कोल्हापूर पॅटर्न वापरण्यात येणार आहे. परंतु कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन कशाप्रकारे तयार केला जात आहे. तसेच हा कोल्हापूर पॅटर्न काय आहे हे जाणून घ्या.

देशावरील कोरोना संकट भयावह आहे. रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने इतर राज्यांतून ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. परंतु यालाही विलंब होत असल्याने राज्य सरकार स्वतःच ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूर पॅटर्नचा उपयोग करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उपजिल्हा रुग्णालयाजवळ ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट बसवण्यात आला आहे. ८० लाख रुपये खर्च करुन हा प्लांट तयार करण्यात आला असून या प्लांटमध्ये दररोज १५० जम्बो सिलेंडर भरू शकेल एवढी क्षमता आहे. त्यामुळे या प्लांटमधील ऑक्सिजन दिवसाला १०० रुग्णांना उपयोगी ठरु शकतो.

- Advertisement -

गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट कसा आहे

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला होता. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ७० किलोमीटर अंतरावरुन ऑक्सिजन आणावा लागत होता. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्धार केला आणि गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट बसवण्यात आला आहे. या प्लांटसाठी ८० लाख रुपयांचा खर्च आला. परंतु या प्लांटने १५० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर दिवसाला भरु शकतो आणि १०० रुग्णांना ऑक्सिजन उपयोगी पडत आहे. हा प्लांट बसवण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ह्या ऑक्सिजन प्लांटसाठी वीजबिलाशिवाय अन्य कोणताही खर्च येत नाही.

चेन्नईमध्ये ऑक्सएअर या कंपनीने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. याच कंपनीशी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी संवाद साधून हा प्लांट कोल्हापूरमध्ये बसवला आहे. या प्रकल्पात हवेतील ऑक्सिजन साठवले जाते आणि त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड बाजूला केले जाते. यानंतर ऑक्सिजन जम्बो सिलेंडरमध्ये साठवला जातो. याला फक्त वीज बिलाचा खर्च आहे. यामुळे हा प्रकल्प फायदेशीर असल्यामुळे राज्यभर असे प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाब आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत विषय मांडला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -