घरक्रीडाWTC Final : अगदी महत्त्वाचा सामना इंग्लंडमध्ये नकोच! पावसामुळे माजी क्रिकेटपटू भडकला

WTC Final : अगदी महत्त्वाचा सामना इंग्लंडमध्ये नकोच! पावसामुळे माजी क्रिकेटपटू भडकला

Subscribe

पावसामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सध्या सुरु आहे. साऊथहॅम्पटन येथे होत असलेल्या या सामन्यात पहिले चारही दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. सततचा पाऊस, तसेच ढगाळ वातावरणामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तर दुसऱ्या दिवशी केवळ ६४.४ षटके टाकली गेली. तिसऱ्या दिवशी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साधारण ७६ षटकांचा खेळ झाला. परंतु, पावसाला सुरुवात झाल्याने खेळ लवकर थांबवावा लागला. इंग्लंडमधील हवामान हे सतत बदलत असते. याच अनिश्चित हवामानामुळे यापुढे आयसीसीने अगदी महत्त्वाचा सामना इंग्लंडमध्ये घेणे टाळले पाहिजे, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला वाटते.

- Advertisement -

सामना दुबईत झाला पाहिजे होता

‘मला हे बोलताना दुःख होत आहे, पण एकमेव आणि अगदी महत्त्वाचा सामना इंग्लंडमध्ये होता कामा नये,’ असे पीटरसन आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला. त्यानंतर त्याने थोड्या वेळाने आणखी एक ट्विट केले. ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यासाठी मी दुबईची निवड केली असती. त्रयस्थ ठिकाण, उत्कृष्ट मैदान, हवामानाची खात्री, सरावासाठी उत्तम सोय आणि तिथे प्रवास करणेही सोपे आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आयसीसीचे ऑफिस हे या मैदानाच्या शेजारीच आहे,’ असे पीटरसनने त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -