घरताज्या घडामोडीMumbai corona update: दिलासा! कोरोना मृत्यूच्या आकड्यात घट; गेल्या २४ तासात ५२१...

Mumbai corona update: दिलासा! कोरोना मृत्यूच्या आकड्यात घट; गेल्या २४ तासात ५२१ बाधितांची नोंद; ७ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईसह राज्यभरात कहर केला आहे. दरम्यान राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनानं उपाययोजना करुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले. रविवारी मुंबईत ७३३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवारी मुंबईत रविवारच्या तुलनेत कोरोना बाधितांसह मृतांच्या आकड्यातही घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ५२१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे तर केवळ ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लसच्या व्हेरिएंट्समुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आजची आकडेवारी बघता काहीशी सकारात्मक परिस्थिती मुंबईत असल्याचे चित्र आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २१ हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामध्ये मागील २४ तासात ५२१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ६७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ६८५ कोरोना रुग्णांनी मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात १४ हजार ६३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत १५ हजार ३०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये मगाील २४ तासात ७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात २६ हजार २८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६८ लाख ४१ हजार ३१४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा दर ९५ टक्क्यावर गेला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत १६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सक्रीय ८३ सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५ रुग्ण पुरुष व २ रुग्ण महिला होते. ४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -