घरक्रीडायुवराज सिंगने 'हिटमॅन'ला रितिकापासून दूर राहण्याची दिली होती धमकी, जाणून घ्या काय...

युवराज सिंगने ‘हिटमॅन’ला रितिकापासून दूर राहण्याची दिली होती धमकी, जाणून घ्या काय होतं कारण?

Subscribe

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सर्व फॉरमॅटमध्ये सध्याचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. रोहित शर्मा त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

हिटमॅन ‘रोहित गुरुनाथ शर्मा हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. अशातच भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सर्व फॉरमॅटमध्ये सध्याचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. रोहित शर्मा त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. याशिवाय, या खेळाडूची गणना सर्वकालीन महान सलामीवीरांमध्ये केली जाते.

रोहित शर्मा हा त्याच्या परफेक्ट टायमिंग, सुरेखपणा, आणि सिक्स मारण्याची क्षमता आणि चांगले नेतृत्व कौशल्यासाठी ओळखला जातो. आज रोहित शर्मा हे नाव सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यासारखे व्हायच अस सगळ्यांना वाटत असत. हा खेळाडू आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी.

- Advertisement -

रोहित शर्माला युवराजने रितिकापासून दूर राहण्याची का धमकी दिली होती ?

रोहित शर्मा आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर येथे झाला. रोहित शर्माने 2015 मध्ये रितिकासोबत लग्न केले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. रितिका शर्मा आधीपासून स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करत होती आणि ती युवराजला आधीपासूनच ओळखत होती.

- Advertisement -

Yuvraj slams BCCI: युवराज ने निकाली भड़ास लगाए गंभीर आरोप - Yuvraj slams BCCI Yuvraj exposes anger makes serious allegations

युवराज रितिकाला आपली बहीण मानत होता आणि रितिकाही युवराजला आपला भाऊ मानत होती. त्यादरम्यान रोहित एका अॅड शूटसाठी तिथे पोहोचला होता आणि त्याने युवराजला हॅलो म्हटलं, तेव्हा युवराजने आधी त्याच्याकडे पाहिलं आणि मग रितिकाकडे बघून म्हटलं की ती माझी बहीण आहे आणि तिच्यापासून जरा तू दूरच राहा. असा कडक इशारा युवराजने रोहित शर्माला दिला होता. पण नेमकं पुढे झालं काय हे पाहूया.

रोहितने बोरवली स्पोर्ट्स ग्राउंड क्लबमध्ये रितिकाला केले प्रपोज-

रोहितने बोरवली स्पोर्ट्स ग्राउंड क्लबमधला सांगितला किस्सा तो म्हणाला, जेव्हा माझे शूट संपले तेव्हा रितिका माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की, जर काही हवे असेल तर रोहितने तिच्याशी बोलावे. त्याचवेळी रितिका स्पोर्ट्स मॅनेजमेंट हाताळत असल्यामुळे रितिका आणि रोहितची अनेकदा भेट होत असे आणि यामुळेच हळूहळू दोघांमधील अंतर वाढत गेले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Ritika Sajdeh (Rohit Sharma Wife) Age, Wiki, Family, Images & More...

अशातच यादरम्यान बोरवली स्पोर्ट्स ग्राउंड क्लबमध्ये रोहितने रितिकाला प्रपोज केले. आणि अशाप्रकारे या दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली. तसेच रोहित शर्मानेही आपल्या करिअरची सुरुवात याच ठिकाणाहून केली. अस देखील यावेळी रोहित म्हणाला.


हेही वाचा :

दिल्लीचा अवघ्या 9 धावांनी पराभव; मार्श-सॉल्टची अर्धशतकी खेळी व्यर्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -