घरटेक-वेकड्रोन टेक्नॉलॉजी चालवणार स्वयंचलित एअर टॅक्सी

ड्रोन टेक्नॉलॉजी चालवणार स्वयंचलित एअर टॅक्सी

Subscribe

सिंगापूरमध्ये ड्रायवर लेस एअर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही टॅक्सी ड्रोन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. ही टॅक्सी ड्रायवर लेस आहे.

ड्रायवर लेस टॅक्सीची संकल्पना लोकांमध्ये रूळते आहे. स्वयंचलीत वाहनांसंबंधात रोज नवे प्रयोग होत आहेत. स्वयंचलित टॅक्सी पुढीलवर्षी सिंगापूरमध्ये सुरु होणार आहे. जर्मन विमान कंपनीद्वारे ही टॅक्सी बनवण्यात येतेयं. मागीलवर्षी दुबईमध्ये या टॅक्सीचा डेमो देण्यात आला होता. ड्रोन टेक्नॉलॉजीवर आधारित असलेले ‘व्होल्कोप्टर’ प्रवाशांची वाहतूक करेल. वायू मार्गाने ही वाहतूक करण्यात येईल. या ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे प्रवाशी ट्राफीकमध्ये अडकणार नाहीत. लाखो प्रवासी या टॅक्सीमधून उडून आपल्या घरी प्रवास करु शकतील. सिंगापूरमध्ये पुढील वर्षाच्या मध्यात या टॅक्सीद्वारे प्रवास करता येईल असे टॅक्सी बनवणाऱ्या कंपनीने सांगितले आहे. या टॅक्सीमध्ये दोन प्रावाशी ३० किलोमीटर (१९ मैल) अंतरचा प्रवास करु शकणार आहेत. वायू मार्गाने आपल्या घरी जाण्यासाठी सिंगापूरी नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. शहरातील इमारतींमधून जाण्यासाठी व्होल्कोप्टरला विशेष पद्धतीने डिझाइन केले आहे.

“ही टॅक्सी जमिनीपासून १००० मीटर(३३० फुट) उंचावर उडणार आहे. सामान्य हेलीकॉप्टर येवढा आवाज या टॅक्सींना येणार नाही. ही टॅक्सी रिमोटकंट्रोलद्वारे नियंत्रीत केले जाईल. या टॅक्सींमुळे वाहनांची संख्या वापणाऱ्यांची संख्या कमी होईल. लोकांना ट्राफिकपासून सुटकारातर मिळेलच याचबरोबर त्यांचा वेळही वाचेल.” – टॅक्सी निर्माता कंपनी, प्रवक्ते  

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -