घरमहाराष्ट्रराज ठाकरेंनी लोणार सरोवरावर घालवला निवांत वेळ

राज ठाकरेंनी लोणार सरोवरावर घालवला निवांत वेळ

Subscribe

विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (आज) सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरावर फेरफटका मारायला गेले होते. सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे लोणार विवर आणि कालांतराने त्याचं सरोवर झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, दुर्देवाने पर्यटनाच्या दृष्टीने आजही महाराष्ट्र सरकारला लोणारचं महत्व समजलेलं नाही, असं अनेकांचं मत आहे. राज ठाकरे लोणारला येणार, हे समजल्यावर लोणार पर्यटन वाढीसाठी कार्यरत असलेल्या एका संस्थेचे भुजंग काळे, शैलेश सरदार आणि त्यांचे सहकारी आवर्जून भेटायला आले. काळे आणि त्यांचे सहकारी राज ठाकरे यांना लोणार सरोवराशी संबंधित वैशिष्टयपूर्ण माहिती देत होते. इथल्या मंदिराच्या परिसरात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीला गोड पाणी, तर दुसऱ्या विहिरीला खारट पाणी आहे. त्यामुळे या दोन विहिरींना सासू सुनेच्या विहिरी म्हटलं जातं. लोणार सरोवराबद्दलची सगळी माहिती ऐकून घेतल्यानंतर, राज ठाकरे यांनी विहीरींतचा विषय पुन्हा काढत, “यातील सासू कोण आणि सुन कोण” असा प्रश्न त्यांनी विचारला आणि उपस्थितांमधे एकच हशा पिटला.

 

- Advertisement -

लोणार सरोवराची ठळक वैशिष्ट्य : 

  • लोणार सरोवराचं पाणी समुद्राच्या सातपट खारट आहे
  • इथल्या परिसरातील दगडमातीत सल्फरचं प्रमाण जास्त आहे
  • नैसर्गिक स्रोतापासून इथे फार पूर्वीपासून साबण बनवला जातोय
  • त्यावरूनच इथल्या काही लोकांचं आडनाव साबणकर पडलं
  • मुघल बादशाह अकबर हा सुद्धा लोणारमधे बनलेला साबण वापरायचा. त्याचा उल्लेख आइने अकबरीमधे आहे
  • खजुराहोप्रमाणे इथल्या मंदिरात मैथुनशिल्प आहेत 

वाचा:

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -