घरटेक-वेकPaytm नंतर Zomato आणि Swiggy बॅन! गुगल प्ले स्टोअरकडून नोटीस

Paytm नंतर Zomato आणि Swiggy बॅन! गुगल प्ले स्टोअरकडून नोटीस

Subscribe

Zomato आणि Swiggy आधी १८ सप्टेंबर रोजी गुगलनं डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ला प्ले स्टोअरवरून हटवले होते.

घर बसल्या गरमा-गरम फूड डिलिव्हरी करणारी कंपनी Zomato आणि Swiggy या दोघांना गुगलने नोटीस पाठवली आहे. गुगलचे म्हणणे आहे की, दोन्ही कंपनीने प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे दोन्ही अॅप्सना गुगलकडून प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन केल्याची नोटीस मिळाली आहे. Zomato आणि Swiggy आधी १८ सप्टेंबर रोजी गुगलनं डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ला प्ले स्टोअरवरून हटवले होते. गुगलने पेटीएमवर स्पोर्ट्स बेटिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. मात्र Paytm काही तासांनंतर पुन्हा प्ले स्टोअरवर आले.

Zomato ने सांगितले हे अयोग्य आहे

गुगलकडून नोटीस मिळाल्यानंतर Zomato च्या प्रवक्त्याने सांगितले की, हो गुगलने आम्हाला नोटीस पाठवली आहे पण हे पूर्णपणे अयोग्य आहे. ही नोटीस पूर्णपणे अन्यायकारक आहे परंतु आम्ही काय करू शकतो. आम्ही एक छोटी कंपनी आहोत आणि आम्ही गुगलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपला व्यवसाय करीत आहोत. कंपनीने असेही म्हटले आहे की, आम्ही Google च्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आमची व्यवसाय रणनीती तयार केली आहे. गुगलने Zomato प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य बदलण्यास सांगितले आहे आणि आम्ही त्यावर कार्य करीत आहोत.

- Advertisement -

Swiggy कडून कोणतेही उत्तर नाही

Swiggy अॅपनं अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र कंपनीने आपले स्पोर्ट्स फिचर थांबवले आहे. या विषयावर दोन्ही अॅप्स Google शी बोलत असून गुगलने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. बर्‍याच कंपन्यांना सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संधीचे भांडवल करायचे आहे. अशा परिस्थितीत, ती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी अ‍ॅपमध्ये गेम्स फिचर जोडत आहेत.


World Vegetarian Day: जाणून घ्या, शाकाहारी जेवणाचे फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -