घरCORONA UPDATECorona : भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

Corona : भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्यसभेतील भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यापूर्वी त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.’

- Advertisement -

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर काही मंत्रीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अनेकांनी या आजारावर यशस्वीमध्ये मात केली आहे. आता नारायण राणेदेखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून यावर उपचार घेत आहेत. तसेच राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने इटलीला मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३६ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

हेही वाचा –

‘योगींनी त्यांचं राज्य सांभाळावं’, गृहमंत्री अनिल देशमुखांनी टोचले कान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -