घरटेक-वेकWhatsappवरून एक मॅसेज करून मिळवा वॅक्सीन सर्टिफिकेट, जाणून घ्या नवे फिचर

Whatsappवरून एक मॅसेज करून मिळवा वॅक्सीन सर्टिफिकेट, जाणून घ्या नवे फिचर

Subscribe

कोरोना काळात Whatsapp देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. Whatsappच्या माध्यमातून आपण घरात बसून आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसाठी सातत्याने इतर लोकांच्या संपर्कात आहोत. आता Whatapp असे फिचर घेऊन आले आहे की, ज्यामाध्यमातून युजर्स कोविड-१९ वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील. यासाठी Whatsappने भारतातील केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे.

कोरोना लसीचा डोस घेतलेल्या लोकांना Whatsappच्या या नव्या फीचरद्वारे सर्टिफिकेट सहज डाउनलोड करता येणार आहे. आतापर्यंत वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी लोकांना CoWIN वेबसाईट किंवा Aarogya Setu अॅपवर लॉगिंन करावे लागत होते. परंतु आता हे काम MyGov Corona Helpdesk WhatsApp Chatbot द्वारे केले जाऊ शकते.

- Advertisement -

Whatappवर कसे करायचे वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड

युजर्सला फक्त MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉटचा वापर करावा लागेल. यासाठी युजर्सला आपल्या फोनमध्ये +९१ ९०१३१५१५१५ नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर तुम्हाला Whatsappवर जाऊन या नंबरवर मॅसेज करावा लागेल. मग वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी चॅटमध्ये “Download certificate” असा मॅसेज पाठवा. यानंतर चॅटबॉस तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ६ अंकांचा ओटीपी पाठवेल. हा ओटीपीनंबर चॅटबॉक्समध्ये त्या नंबरवर पाठवा. ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला नाव आणि मोबाईलनंबरसोबत एक मॅसेज येईल. तेव्हा तुम्हाला विचारले जाईल की, वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी १ टाईप करा. त्यानंतर १ लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता.


हेही वाचा – WhatsApp चं भन्नाट फीचर! एकदा पाहिलेले MSG आपोआप होणार Delete

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -