घरमहाराष्ट्र'पक्षप्रमुख ठरवतील तेव्हाच तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश'

‘पक्षप्रमुख ठरवतील तेव्हाच तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश’

Subscribe

आगामी सिनेट निवडणुकांवर युवासेनेचा भगवा, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तेजस ठाकरे लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत बोलताना युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले, पक्षप्रमुख ठरवतील तेव्हाच तेजस यांचा राजकारणात प्रवेश होईल. याबाबत आता घाई करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी सांगितले.

युवा संवाद अंतर्गत युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हे उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. जळगावातील दौर्‍यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. सरदेसाई म्हणाले की, गेल्या काही अनेक वर्षांपासून युवा सेनेत काम करणार्‍यांना पुढे आणायचे आहे. यात नवीन कार्यकर्त्यांना तालुका, जिल्हा पातळीवर उभे करून युवा सेनेची चांगली टीम तयार केली जाणार आहे. हेच युवा कार्यकर्ते दुपटीने काम करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच कोरोनाच्या काळात जो संवाद कमी झालेला होता; तो संवाद करण्यासाठी दौरा आहे. या माध्यमातून संघटना कानाकोपर्‍यापर्यंत पोहचवायची आहे.

- Advertisement -

तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, तेजस ठाकरे राजकारणात येतील का? पद घेतील का? हे मला सांगता येणार नाही. मात्र, तेजस ठाकरे जेव्हा स्वत: ठरवतील, पक्षप्रमुखांना वाटेल, तेव्हा ते राजकारणात येतील याबद्दल शंका नाही. ते योग्यवेळी निर्णय घेतील. आदित्य ठाकरे मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. ते सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. सर्व शिवसेना नेते, युवा सेना त्यांच्यासोबत आहे. मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत. आगामी वर्षात युवासेना सिनेटच्या सर्व निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -