घरटेक-वेकOppo F17 सीरीज: ६ कॅमेऱ्यासह २०२० मधील सर्वात स्लीम फोन लवकरच होणार...

Oppo F17 सीरीज: ६ कॅमेऱ्यासह २०२० मधील सर्वात स्लीम फोन लवकरच होणार लाँच

Subscribe

स्मार्टफोन कंपनी ओप्पो लवकरच ओप्पो एफ 17 आणि ओप्पो एफ 17 प्रो भारतात दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीने स्मार्टफोनचे टीझरही जाहीर केला आहे, त्यामुळे त्यांचे डिझाइन बर्‍याच प्रमाणात समोर आले आहे. याशिवाय एक प्रमोशनल पोस्टरही ऑनलाइन लिक करण्यात आले असून त्यात दोन्ही फोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत, यामध्यचे ओप्पो एफ 17 प्रो हा या वर्षीचा सर्वाच स्लीम फोन असल्याचा कंपनीचा दावा केला आहे.

या स्मार्टफोनला असणार 6 कॅमेरे

ओप्पो इंडियाच्या ट्विटर हँडलवर कंपनीने एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. असे म्हटले आहे की ओप्पो एफ 17 प्रो डिव्हाइस केवळ 7.48 मिमी इतका स्लीम असणार आहे. या फोनचे वजन केवळ 164 ग्रॅम असणार असून याव्यतिरिक्त, ड्युअल-पंच होल डिस्प्लेसह स्मार्टफोन व्हिडिओमध्ये दिसू शकतो. म्हणजेच यात दोन फ्रंट कॅमेरे असू शकतात. इतकेच नाही तर मागच्या बाजूला क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. मागील कॅमेरा स्क्वेअऱ आकारात दिले आहेत.

- Advertisement -

मायस्मार्टप्रिसच्या अहवालानुसार ओप्पो एफ 17 स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ब्लू, व्हाइट, ग्रे, ऑरेंज, ब्लॅक आणि सिल्व्हर – 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये मालिका स्मार्टफोन येणार आहे. मात्र कोणते डिव्हाइस कोणत्या रंगात असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे स्मार्टफोन सप्टेंबरच्या सुरूवातीला भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. त्यांची ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन मार्फत विक्री करण्यात येणार आहे. असे सांगितले जात आहे की, २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात.


POCO 120Hz डिस्प्लेचा स्मार्टफोन घेऊन येणार आणि OnePlus Nord देणार टक्कर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -