सॅमसंगचा Galaxy Tab S6 Lite भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

या टॅबसाठी १६ जूनपासून तुम्ही प्री-बुकिंग करू शकता.

Samsung Galaxy Tab S6 Lite to Launch in India
सॅमसंगचा Galaxy Tab S6 Lite भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

साउथ कोरियाची कंपनी सॅमसंग ने भारतात नवीन टॅब Galaxy Tab S6 Lite लाँच केला आहे. यासोबत S Pen देखील दिला आहे. Galaxy Tab S6 Lite तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. ऑक्सफोर्ड ग्रे, अंगोरा ब्लू आणि शिफॉन पिंक मध्ये आहे. हा टॅब LTE आणि WiFi या दोन्ही मॉडेमध्ये मिळेल.

या टॅबची किंमत

Galaxy Tab S6 Lite च्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे. ही LTE व्हेरिएंटची किंमत आहे. म्हणजेच तुम्ही यात सिम टाकून इंटरनेटचा वापर करू शकता. दुसरा WiFi व्हेरिएंट आहे. त्याची किंमत २७,९९९ रुपये आहे. दोघांची मेमरी व्हेरिएंट सारखी आहे.

ऑफर

१६ जूनपासून ग्राहक या टॅबसाठी प्री-बुकिंग करू शकतात. प्री-बुकिंगवर ग्राहकांना Galaxy Buds+ २९०० रुपयांत खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. शिवाय Galaxy Tab S6 Lite Book Cover जो २,९९९ रुपयांचा आहे पण हा तो फक्त २,९९९ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, Galaxy Tab S6 Lite विक्री १७ जूनपासून सुरू होत आहे. सॅमसंग ओपरा हाऊस, सॅमसंग वेबसाइट आणि लीडींग ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर तुम्ही हा टॅब खरेदी करू शकता.

या टॅबमधील फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Galaxy Tab S6 Lite मध्ये १०.४ इंचाची WUXGA डिस्प्ले दिला आहे. याची मेटल युनिबॉडी डिझाईन आहे. मागील बाजूस ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिस्प्लेमध्ये पातळ बेझल्स दिले आहेत आणि त्याचे वजन ४६७ ग्राम आहे. मल्टी टास्किंगसाठी तुम्ही S Penचा वापर करू शकता. या पेनाची टीप 0.7mm आहे. म्हणजेच तुम्ही टॅब्लेट पेंटिंगसाठी किंवा हलक्या फुलक्या आर्ट वर्कसाठी वापरू शकता.

सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या टॅबलेटमध्ये AKG पावर्ड साउंड दिला आहे. जो सॅमसंगच्या ऑडिओ कंपनीचा आहे. यामध्ये ड्युअल स्पीकर्स आहेत. शिवाय Dolbt Atmos 3D सराउंड साउड एक्सपीरिएंस आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.

या टॅबची बॅटरी 7,040mAh आहे. या टॅबला पूर्ण चार्ज करून १३ तास व्हिडिओ प्लेबॅक करू शकता, असा कंपनीचा दावा आहे. यासोबत दिलेल्या S Pen ला चार्ज करण्याची गरज नाही. टॅबमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही आहे. परंतु फेस रिकॉग्निशन दिला आहे.

सॅमसंगच कंपनीचे म्हणणे आहे की, Netflix आणि Spotify सोबत पार्टनर्शिप केली आहे. कारण युजर्स त्यांच्या पसंतीच्या अ‍ॅप्सचा चांगला अनुभव घेऊ शकेल. या टॅबमध्ये Samsung Kids पण दिला आहे.


हेही वाचा – Airtel कंपनी ‘या’ ग्राहकांना देतेय 1000GB डेटा!