घरटेक-वेकIOS युजर्ससाठी GoodNews! Twitter वर कमावता येणार पैसे; जाणून घ्या नवं फिचर्स

IOS युजर्ससाठी GoodNews! Twitter वर कमावता येणार पैसे; जाणून घ्या नवं फिचर्स

Subscribe

ट्विटर नेहमीच आपल्या युजर्ससाठी नव नवीन फिचर्स लाँच करत असते. यावेळी देखील ट्विटरने iOS युजर्ससाठी Ticketed Spaces फिचर लाँच केले आहे. जर तुम्ही या फीचरबद्दल विचार करत असाल की, नेमकं हे काय आहे. तर हे फिचर एक पेड ऑडिओ रूम आहे. Spaces युजर्संना त्यांच्या ऑडिओ रूममध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडून पैसे आकारू शकतात. सध्या काही iOS युजर्ससाठी या फिचरची चाचणी करत असल्याचे ट्विटरने सांगितले आहे. जूनच्या सुरुवातीलाच ट्विटरने iOS आणि अँड्रॉइड युजर्ससाठी Ticketed Spaces आणि सुपर फॉलोअर्स जाणून घेण्यासाठी त्यांच्या दर्शकांबरोबर त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया शेअर केल्यात.

ज्या लोकांना पैसे कमवायचे आहेत त्यांना आम्ही मदत करू इच्छितो, काही होस्ट Ticketed Spaces बनवू शकतील. आम्ही सध्या फक्त iOS वर चाचणी करत आहोत, पण आम्हाला आशा आहे की हे सर्व लवकरच सर्वांपर्यंत पोहोचेल. आम्हाला माहित आहे की याला थोडा वेळ लागणार आहे, पण आम्ही लवकरच तुमच्यासाठी हे फिचर लाँच करू इच्छितो, असे कंपनीने म्हटले आहे. ट्विटरने आपल्या व्यासपीठावर याची घोषणा केली. मात्र यावेळी ट्विटरने हे फिचर भारतीय युजर्ससाठी असेल कीस नाही हे अद्याप स्पष्ट केले नाही. Ticketed Spaces युजर्सना म्यूजिक कॉन्सर्ट, सेशन, एक्सक्लूसिव्ह, ऑडियो शो होस्ट करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, परंतु युजर्स त्यांच्यामध्ये विनामूल्य सहभागी होऊ शकणार नाहीत. Ticketed Spaces वापर करून, क्रिएटर लोकांकडून पैसे घेऊन काही पैसे कमवू शकतात. शोचा विषय किंवा आशय बऱ्यापैकी मोहक असणं आवश्यक आहे. कारण लोकं त्या Spaces साठी पैसे देण्यास तयार झाले पाहिजेत.

- Advertisement -

ट्विटरकडून असेही सांगितले जात आहे की, होस्ट त्यांच्या तिकीटाची किंमत ठरवू शकणार आहे. तसेच ते $ १ इतके कमी आणि $ ९९९ इतके उच्च असू शकते. Ticketed Spaces वर साधारण १०० लोकांना आमंत्रित केले जाऊ शकते. एवढेच नाही तर होस्ट उपस्थितांना त्यांच्या डिव्हाइसवर थेट पाठवलेल्या पुश आणि इन-अॅप नोटिफिकेशनसह रिमाइंडर पाठवू शकतो आणि आपल्या स्पेसची माहिती थेट आपल्या होम टाइमलाइनवर शेअर करू शकतो.


 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -