घरटेक-वेकWhatsapp बंद झालंय? मेसेजिंगसाठी करा 'या' App चा वापर

Whatsapp बंद झालंय? मेसेजिंगसाठी करा ‘या’ App चा वापर

Subscribe

जगभरात व्हॉट्सअॅप सेवा अचानक बंद झाली आहे. यााबाबत मोठ्या प्रमाणात युजर्स तक्रारी करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता तक्रारींचा पूर आला आहे. अनेक युजर्स व्हॉट्सअॅप अन इनस्टॉल करत परत इनस्टॉल करत आहेत. मात्र अद्याप दीड तासांपासून सेवा ठप्प आहे. व्हॉट्सअॅपची सेवा यापूर्वीही अनेकदा डाऊन झाली आहे, मात्र ही समस्या फार काळ टिकत नाही. दुपारी 12.36 वाजल्यापासून व्हॉट्सअॅपची सेवा बंद आहे.

भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेसह जगातील अनेक भागांमध्ये अॅपची सेवा बंद आहे. ट्विटरवरील युजर्स इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्याची तक्रार करत आहेत. एका एजन्सीच्या अहवालानुसार, मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, त्यांना या वर्तमान समस्येची जाणीव आहे आणि ते त्याचे निराकरण करण्याचे काम करत आहेत. लवकरचं ‘व्हॉट्सअॅप लवकरच सर्वांसाठी सुरु केली जाईल.

- Advertisement -

दरम्यान आता व्हॉट्सअॅप सेवा बंद असली तरी तुम्ही इतर कोणतेही पर्यायी अॅप्सचा वापर करू शकता. इन्स्टंट मेसेज प्लॅटफॉर्मची सेवा केवळ व्हॉट्सअॅपवरच नाही तर इतर अनेक अॅप्सवरही उपलब्ध आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून हे अॅप वापरू शकता . चला जाणून घेऊया या अॅप्सची माहिती.

टेलीग्राम (Telegram)

व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून या अॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅपचे आणखी फीचर्स मिळतात. यावर तुम्हाला चॅनेल आणि इतर फीचर्स देखील मिळतात. अधिक फीचर्स असूनही हे अॅप व्हॉट्सअॅपइतके लोक वापरत नाहीत. हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे.

- Advertisement -

सिग्नल (Signal)

व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून या अॅपचा वापर केले जातो. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत हे अॅप आधीपासूनच व्हॉट्सअॅपवरून अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते. तुम्हाला व्हॉट्सअॅपचा पर्याय हवा असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा अपॅ देखील विनामूल्य डाउनलोड करू शकता.

डिसकोर्ड (Discord)

डिसकोर्ड हा प्लॅटफॉर्म इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून सुरू झाला नाही. त्याऐवजी ते फेलो गेमर्स गप्पा मारण्यासाठी बनवले गेले होते, परंतु आता तुम्ही व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून वापरू शकता. त्याचे डीएम फीचर अनेकांना खूप आवडते. तुम्ही हे अॅप सर्व Android, iOS, Windows, Linux, MacOS वर वापरू शकता.

स्नॅपचॅट (Snapchat)

या अॅपवर तुम्हाला व्हॉट्सअॅपसारखे वाटणार नाही तर इन्स्टाग्रामसारखे वाटणार आहे, परंतु तुम्ही इन्स्टंट मेसेजिंगसाठी याचा वापर करू शकता. तुम्ही हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत डाउनलोड करू शकता.


bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेचे मुहू्र्त आणि विधी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -