घरटेक-वेकहुश्श्य! दोन तासांनंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत, नेटकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

हुश्श्य! दोन तासांनंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत, नेटकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Subscribe

मुंबई – गेल्या दोन तासांपासून ठप्प झालेल्या व्हॉट्सअॅपची सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप सेवा ठप्प झाली होती. जगभरात व्हॉट्सअॅप सेवा खंडीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली होती. मात्र, आता व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत झाली आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपची सेवा अद्यापही खंडीत आहे. केवळ मोबाईल वापरकर्त्यांचीच सेवा पूर्ववत झाली आहे. तर, काही वापरकर्त्यांना अद्यापही व्हॉट्सअॅप सेवा वापरण्यास अडचणी येत आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे दुपारी साडेबाराच्या दरम्यान व्हॉट्सअॅप डाऊन झाले होते. मेसेज येणे आणि जाणे बंद झाले होते. सुरुवातीला व्हॉट्सअॅप वेब बंद झाले होते. त्यानंतर, मोबाईलमधील व्हॉट्सअॅपही बंद झाले. मेसेज येणे आणि जाणे बंद झाल्याने नेटकऱ्यांनी आपला मोर्चा ट्विटर आणि फेसबूककडे वळवला. सुरुवातीला लोकांना मोबाईलमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाली असावी असं वाटलं. परंतु, ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊन हॅशटॅग ट्रेंड झाल्याने ही समस्या जगभर असल्याचं समजलं. त्यानंतर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.

- Advertisement -


दरम्यान व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर तासाभराने कंपनीच्या प्रवक्त्याने अधिकृत माहिती दिली. तसेच, लवकरच सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. तांत्रिक अडचणींमुळे व्हॉट्सअॅप सेवा खंडित झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता सेवा सुरू झाल्याने जगभरातील खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -