घरठाणेचोवीस तासांत ठाण्यात 200 मिमी पाऊस; नाल्यामध्ये मुलगा वाहून गेला, 88 तक्रारींची नोंद

चोवीस तासांत ठाण्यात 200 मिमी पाऊस; नाल्यामध्ये मुलगा वाहून गेला, 88 तक्रारींची नोंद

Subscribe

ठाणे : ठाणे (Thane) शहरात मागील चोवीस तासात झालेल्या पावसाने 200 मिमीचा आकडा पार केला. या चोवीस तासात पावसाने आजच्या दिवशीच गतवर्षापेक्षा यंदा 300 हुन अधिक मिमी जास्तीची नोंद केली आहे. त्यातच विविध तक्रारींचा ही पूर आला आहे. तब्बल 88 तक्रारींपैकी 38 तक्रारी या पाणी तुंबल्याचा असून 19 झाडे कोसळण्याच्या आहेत. त्यातच दिवा, खर्डी गाव येथील नाल्यात 16 वर्षीय मुलगा काल वाहून गेला आहे आणि अद्यापही बेपत्ता आहे. बुधवारप्रमाणे आजही पावसाचा जोर दिसून येत आहे. (200 mm rain in Thane in 24 hours Boy swept away in stream 88 complaints recorded)

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आंदोलन; कार्यकर्त्यांकडून किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

- Advertisement -

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरूवात झाली आणि पहिल्या तीन तासांतच पावसाने सुमारे 50 मिमीची नोंद केली. त्यानंतर पुढे तीन ते चार पाऊस सुरूच असल्याने आकडा 100 मिमी वर गेला. पावसाचे दिवसभर बरसने सुरूच राहिल्याने आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत म्हणजेच चोवीस तासात 200.08 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 506.46 मिमी पाऊस शहरात नोंदवला गेला आहे. गतवर्षी याच दिवशी 198.32 मिमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे यंदा 316.14 मिमी अधिकचा पाऊस झाल्याचे दिसत आहे.

मागील चोवीस तासात झालेल्या पावसाने नालेसफाई आणि गटार सफाईची पोलखोल केली आहे. चोवीस तासात तब्बल 38 ठिकाणी पाणी तुंबल्याचे समोर आले. त्यातच 19 ठिकाणी झाडे कोसळ्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय मुंब्र्यात एका ठिकाणी इमारतीचा स्लॅब कोसळला आहे, तर दोन ठिकाणी दरड पडली आहे. शिवाय दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. इतर सात घटना मिळून एकूण 88 तक्रारींची नोंद झाल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात; आरोप करत संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

नाल्यामध्ये पडलेला मुलगा अजूनही बेपत्ता

बुधवारी दिवसभर जोरदार झालेल्या पावसामुळे नाल्यातील पाणी जोराने वाहत होते. त्यातच दिवा, खर्डी गाव येथील एम एस कंपाऊंड या ठिकाणी नाल्यामध्ये दिव्यात राहणारा वसीम सय्यद नावाचा मुलगा पडल्यानंतर वाहून गेला आहे. तो अद्यापही सापडलेला नाही. वसीम हा 16 वर्षीय असून तो बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नाल्यामध्ये पडला. याघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शोधकार्य केले असता वाहून गेलेला मुलगा सापडला नाही तसेच रात्रीचा अंधार असल्याने शोधकार्य करणे शक्य नसल्याने आज सकाळी पुन्हा पोलिसांच्या उपस्थितीत शोधकार्य करण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -