घरठाणे75 कोटी वसूल करण्याचे निर्देश

75 कोटी वसूल करण्याचे निर्देश

Subscribe

काँग्रेसच्या मागणीला मोठे यश

ठाणे शहरातील वागळे स्टेट विभागातील एमआयडीसीच्या भूखंडावर विकासाकडून काम सुरू होते. ठाणे महानगरपालिकेने या ठिकाणी नो बोअरवेल झोन जाहीर केलेला असताना बोरवेल खोदत जमिनीखाली 100 मिटर खोल असणार्‍या जलबोगद्यास हानी पोहोचविण्यात आली होती.तसेच ऐन उन्हाळ्यात मुंबई व ठाणे येथे मोठ्या प्रमाणात पाणी कपात असताना मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणाहून दररोज पाच ते सहा दशलक्ष लिटर पाणी गटारे व नाल्यात वाहून जात आहे. अद्यापपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न झाल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या अधिकार्‍या च्या निदर्शनास आणून दिलेली होती.

राहुल पिंगळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ज्याला बोगद्याच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले आहे. मोठ्या प्रमाणात असणारे काम पूर्ण करण्यासाठी अजून किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. जलबोगद्यास हानी पोहोचवून पाण्याच्या नासाडीसाठी जबाबदार असणार्‍या विकासकांकडून 75 कोटी वसूल केले जाणार आहेत. यामध्ये दुरुस्तीचा खर्च 140 कोटी वाया जाणारे पाणी आणि चार पट दंड वसूल केला जाईल ही कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एमआयडीसीला पत्र दिले असून संबंधित बेजबाबदार विकासाकडून 75 कोटी वसूल करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

- Advertisement -

याबाबत बोलताना राहुल पिंगळे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व प्रसार माध्यमांचे आभार मानलेले आहेत. ठाणे शहरात जल बोगद्यासह, जलवाहिनी फोडण्याच्या चार घटना घडलेल्या व सातत्याने आम्ही याबाबत आवाज उठवत असताना विविध प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरला. परंतु अशा प्रकारच्या घटना घडल्यावर काम करणार्‍या यंत्रणांवर कुठल्याही प्रकारची ठोस कायदेशीर कारवाई होत नसल्याने सातत्याने अशा घटना घडत आहेत.याला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागामार्फत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची नियमावली करण्याचे मागणी देखील राहुल पिंगळे यांनी केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -