घरठाणेवीजचोरी रोखण्यासाठी औद्योगिक महामंडळाचे महावितरणला साकडे

वीजचोरी रोखण्यासाठी औद्योगिक महामंडळाचे महावितरणला साकडे

Subscribe

बारवी धरणाच्या उंचीवाढीमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांकडून 2018 पासुन होणारी वीज चोरी रोखून महावितरणचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महावितरणला साकडे घातले असुन कोट्यवधी रुपयांच्या होणाऱ्या वीजचोरीकडे महावितरण कानाडोळा करत असल्याने नियमित ग्राहकांना या विज चोरीचा फटका बसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाची उंची वाढीमुळे परिसरातील तोंडली,काचकोली, मोहघर, कोळे वडखळ, सुकाळवाडी,मानिवली या बाधित गावचे औद्योगिक विकास महामंडळाने सुरक्षित स्थळी पुनर्वसन करुन घरटी लाखों रुपयांची भरपाई व नोकरी दिली.

त्यामध्ये अनेक घरमालकाने जन्मदात्या आई वडिलांना बेवारशी दाखवुन त्यांचे नावे औद्योगिक महामंडळाकडून भरपाई व त्यांचे नातेवाईकांना नोकरी मिळवली. असे असताना या प्रकल्पग्रस्तांनी एक एका घराची पाच पाच घरे दाखवुन औद्योगिक विकास महामंडळाकडून भरपाई घेतली. औद्योगिक विकास महामंडळाने दिलेल्या प्लॉटचे ठिकाणी 2018 पासुन शानदार बहुमजली बंगले बांधले असुन ते बांधकाम करताना चोरीची लाईट वापरली असताना आजपर्यंत महावितरणने त्यांना अधिकृतपणे विज पुरवठा दिलेला नसल्याने भविष्यात होणारी कारवाई टाळण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ वेळोवेळी महावितरणला पत्र व्यवहार करत असुनही त्याची कोणतीही प्रकारे दखल घेतली नाही. दरम्यान एखाद्या सर्वसामान्य ग्राहकांचे हजार रुपये बिल थकले तर त्याला महावितरण न्यायालयात खेचते.परंतु या प्रकल्पग्रस्तांकडून कोट्यवधी रुपयांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -