घरठाणेउच्च शिक्षित तरुणाने डोंबिवलीत बँकेचे एटीएम फोडले

उच्च शिक्षित तरुणाने डोंबिवलीत बँकेचे एटीएम फोडले

Subscribe

तरुणाला अटक

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न एक तरुण ड्रिल मशिनचा वापर करून करत होता. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रमोद चोरडीया (३५) या तरुणाला अटक केली. यातील आरोपी हा एम काॅम शिकलेला पदव्युत्तर पदवीधर आहे.

हा तरुण इंदूर येथील आहे. तो एटीएममध्ये पैसे काढणे आणि भरणे हे काम करणार्‍या सिस्को कंपनीत काम करतो. तो वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर आहे. असे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी सांगितले. रात्रीच्या वेळेत गस्त घालताना निवासी, औद्योगिक वस्ती बरोबर एटीएममध्ये चोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे पोलिसांना दिले आहेत.

- Advertisement -

रविवारी मध्यरात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचच्या ठिकाणी असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएमचे शटर बंद होते. एटीएम असलेल्या बंद खोलीतून ड्रिलमशिनचा आवाज येत असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने एटीएम मशिन लावलेले शटर ठाठावले असता, आतील ड्रिलमशिनचा आवाज बंद झाला. त्यावेळी अधिकारी, अंमलदार यांनी एटीएममध्ये नक्की चोर असल्याचा संशय आला. पोलिसांनी सतर्कपणे एटीएमचे शटर उघडले. आत मधील एका इसमाने पोलिसांना धक्का मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -