तहानेने व्याकूळ झालेल्या कुत्र्याचे तोंड अडकले बरणीत

अंबरनाथ पोलिसांनी केली सुटका

पाणी किंवा भाकरीच्या शोधात आलेल्या कुत्र्याचे तोंड बरणीत अडकल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये  समोर आले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर भटका कुत्रा भाकरीच्या शोधात आला. याठिकाणी असलेल्या बरणीत त्याने तोंड टाकले, मात्र तोंड बरणीतच अडकल्याने श्वान घाबरून गेला.

या ठिकाणी ऑन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी गुरूनाथ मसने आणि नागनाथ पवार यांनी तात्काळ त्याला पकडून अनेक प्रयत्नानंतर त्याची सुटका केली. कुत्र्याला या संकटातून मुक्तता करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. केवळ माणसांच्याच नाही तर प्राण्यांनाही संकटातून मुक्त करणारे पोलीस म्हणून नागरिकांनी या कर्मचा-यांचे कौतूक केले.