घरट्रेंडिंगअरेरे ! पेस्ट्रीची लावली पार वाट ; PHOTO पाहून खव्वयांचा उडाला विश्वास

अरेरे ! पेस्ट्रीची लावली पार वाट ; PHOTO पाहून खव्वयांचा उडाला विश्वास

Subscribe

स्ट्रीट फुड खाणे प्रत्येक खव्वयांच्या फार आवडीचा विषय आहे. मात्र हल्ली स्ट्रीट फुडमध्ये काहीतरी नाविण्य आणण्यासाठी जे काही पराक्रम केले जातात त्याने खव्वयांचा आवडता पदार्थही नावडता होऊन जातो. नवीन पदार्थ खाणे कोणाला नाही आवडत ? मात्र, हल्ली दुकानात असे काही पदार्थ बनवले जातात की तुमचा विश्वासच उडून जाईल.

स्ट्रीट फुड खाणे प्रत्येक खव्वयांच्या फार आवडीचा विषय आहे. मात्र हल्ली स्ट्रीट फुडमध्ये काहीतरी नाविण्य आणण्यासाठी जे काही पराक्रम केले जातात त्याने खव्वयांचा आवडता पदार्थही नावडता होऊन जातो. नवीन पदार्थ खाणे कोणाला नाही आवडत ? मात्र, हल्ली दुकानात असे काही पदार्थ बनवले जातात की तुमचा विश्वासच उडून जाईल. अशाच प्रकारे एका पठ्ठ्याने पेस्ट्रीची पार वाट लावली आहे. आपल्या आजूबाजूला किंवा तुम्ही स्वत: जर पेस्ट्री लवर असाल? तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मोठा धक्काच बसेल. कदाचित तुम्ही पेस्ट्री खाणेसुद्धा सोडून द्याल. किंवा असं काही होऊ शकतं यावर तुमचा विश्वासच उडेल. वीयर्ड फुड कॉम्बिनेशनमुळे लोकांनी काय खाल्ले असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

 

- Advertisement -

ट्विटरवर हा फोटो व्हायरल होत आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, यामुळे कोविड परत जात नाही. या फोटोमध्ये आकर्षक दिसणाऱ्या आणि मुळात खव्वयांच्या आवडीचा पेस्ट्रीचा तुकडा चक्क बेसनाच्या पिठात बुडवताना दिसतो. या पेस्ट्रीला तरी काय माहीत भाऊ, त्याला असं तळंल जाणार आहे. दुसऱ्या फोटोत, गरम तेलात पेस्ट्रीला तळले जात आहे. हे पाहून खव्वयांचा विश्वास उडाला आहे. एका युजरने सांगितले की, हे गुजरातीच लोक असणार, तर एकाने आमिर खानचा एक डायलॉगही लिहिला आहे. ‘इस गोला में अब नहीं रहना हैं’ ,अशा अनेक कमेंट येत आहेत. एकूणच पेस्ट्रीवर केलेला हा प्रयोग लोकांना आवडला नाही.

- Advertisement -

हे ही वाचा – आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडेंचा ‘धर्मवीर’ हा दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -